धनंजय मुंडेंचीही जीभ घसरली.. एकेरी उल्लेख करत गिरीश महाजनांना म्हणाले 'पिस्तुल्या'

धनंजय मुंडेंचीही जीभ घसरली.. एकेरी उल्लेख करत गिरीश महाजनांना म्हणाले 'पिस्तुल्या'

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे विरोधापक्ष नेते धनंजय मुंडे यांची जीभ घसरली. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना धनंजय मुंडे यांनी पिस्तूल्या असे संबोधले आहे.

  • Share this:

बीड, 7 ऑगस्ट- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे विरोधापक्ष नेते धनंजय मुंडे यांची जीभ घसरली. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना धनंजय मुंडे यांनी पिस्तूल्या असे संबोधले आहे. प्रेमाने आपण त्यांना पिस्तूलराव म्हणतो तर काहीजण लाडाने पिस्तुल्या म्हणतात, असेही ते म्हणाले.

परळी येथील शेतकरी मोर्चाला संबोधित करताना धनंजय मुंडे यांनी गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख केला. धनंजय मुंडे यांनी असे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. राष्ट्रवादीतर्फे परळीत बुधवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी एकेरी उल्लेख करत गिरीश महाजन यांचे उदाहरण दिले. त्यांनी मेडिकल कॉलेज जळगावला नेले. पंकजा मुंडेंनी तर आहे ते उद्योग बंद पाडले, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी टीका केली.

पंकजा मुंडेंनी पोषण आहारातून 1500 कोटी कमावले..

गेल्या चार वर्षांच्या टीएचआरच्या टेंडर पोषण आहारमध्ये हजार पंधराशे कोटी कमावले. साधेसुधे नाही हजार पंधराशे मग शेतकऱ्यांच्या उसाचे पैशे कां ठेवता.. असा गंभीर आरोप धनंजय मुंडें यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे. वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे थकीत बिलाचे पैशे एफआरपीसह तत्काळ द्या, अन्यथा शासनाने संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी धनंजय मुंडें यांनी केली. पैशे आजच्या आजएफआरपीप्रमाणे द्यावेत, कायद्याने संचालक मंडळावर कारवाई करावी. अशी मागणी केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या घणाघाती आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

धनंजय मुंडेंचा भरपावसात परळीत ठिय्या

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उठणार नाही, असे सांगत धनजंय मुंडे यांनी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसह भरपावसात ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत उठणार नाही, या निर्णयावर धनंजय मुंडे ठाम आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये परळी तालुक्यातील बहुतांश शेतकरी सहभागी झाले. सोयाबीनसह सर्व पिकांचा पीक विमा मिळावा, वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या ऊसाची बिले मिळावीत, दुष्काळामुळे दुबार पेरणीसाठी मदत करावी, मागील काळातील थकीत अनुदाने द्यावेत, सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले

आहेत. त्याबरोबर परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, परळी तालुक्यातील प्रकल्पांचा वॉटर ग्रीड योजनेत समावेश करावा, परळी औष्णिक विद्युत केंद्र पुन्हा सुरू करावे, यासह शेतकरी, शेतमजूर आणि परळी शहरातील नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या जागेवरच धनंजय मुंडेंनी आत्ता ठिय्या केला आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडली.

VIDEO : महापुरात नको ते धाडस करू नका, राणादाने दिला हा सल्ला

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2019, 10:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading