पंकजा मुंडेंनी पोषण आहारातून 1500 कोटी कमावले, धनंजय मुंडेंचा आरोप

पंकजा मुंडेंनी पोषण आहारातून 1500 कोटी कमावले, धनंजय मुंडेंचा आरोप

चार वर्षांच्या टीएचआरच्या टेंडर पोषण आहारमध्ये हजार पंधराशे कोटी कमावले. साधेसुधे नाही हजार पंधराशे मग शेतकऱ्यांच्या उसाचे पैशे कां ठेवता.. असा गंभीर आरोप धनंजय मुंडें यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे. परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात धनंजय मुंडे बोलत होते.

  • Share this:

बीड, 7 ऑगस्ट- चार वर्षांच्या टीएचआरच्या टेंडर पोषण आहारमध्ये हजार पंधराशे कोटी कमावले. साधेसुधे नाही हजार पंधराशे मग शेतकऱ्यांच्या उसाचे पैशे कां ठेवता.. असा गंभीर आरोप धनंजय मुंडें यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे. परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात धनंजय मुंडे बोलत होते. वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे थकीत बिलाचे पैशे एफआरपीसह तत्काळ द्या, अन्यथा शासनाने संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी धनंजय मुंडें यांनी केली. पैशे आजच्या आजएफआरपीप्रमाणे द्यावेत, कायद्याने संचालक मंडळावर कारवाई करावी. अशी मागणी केली. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या घणाघाती आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

धनंजय मुंडेंचा भरपावसात परळीत ठिय्या

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उठणार नाही, असे सांगत धनजंय मुंडे यांनी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसह भरपावसात ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य होईपर्यंत उठणार नाही, या निर्णयावर धनंजय मुंडे ठाम आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये परळी तालुक्यातील बहुतांश शेतकरी सहभागी झाले. सोयाबीनसह सर्व पिकांचा पीक विमा मिळावा, वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या ऊसाची बिले मिळावीत, दुष्काळामुळे दुबार पेरणीसाठी मदत करावी, मागील काळातील थकीत अनुदाने द्यावेत, सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले

आहेत. त्याबरोबर परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, परळी तालुक्यातील प्रकल्पांचा वॉटर ग्रीड योजनेत समावेश करावा, परळी औष्णिक विद्युत केंद्र पुन्हा सुरू करावे, यासह शेतकरी, शेतमजूर आणि परळी शहरातील नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या जागेवरच धनंजय मुंडेंनी आत्ता ठिय्या केला आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडली.

महाजनादेश नन्हे 'महाधनादेश' यात्रा

भाजपने काढलेली महाजनादेश यात्रा नाही तर 'महाधनादेश' यात्रा आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी खिल्ली उडवली. जनआशीर्वाद यात्रेवरूनही मुंडे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा मंगळवारी किल्ले शिवनेरीवर प्रारंभ झाला. यावेळी मुंडेंनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली.

धनंजय मुंडे म्हणाले की, या महाराष्ट्रात गेली पाच वर्षे जे राज्यकर्ते आहेत, त्यांनी सर्वात आधी शिवछत्रपतींचा अपमान केला. देशाच्या पंतप्रधानांनी स्मारकाचं भूमीपूजन करूनही त्याची एक खडी ही उभी केली नाही. शिवछत्रपतीच्या नावाने जी कर्जमाफी या सरकारने आणली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यातही शेतक-यांना फसवलं. लाखो बेरोजगार तरुणांची महाभरतीच्या नावाखाली फसवले. मात्र, खरी महाभरती ते त्यांच्या पक्षातली करतायेत. शासकीय पदांची महाभरती ते करत नाहीत, असा टोलाही लगावला. सत्तेची मस्ती भाजप-शिवसेनेला आली आहे. सत्तेची मस्तीच आज राजकीय भ्रष्टाचार करायला या लोकांना लावतेय. असेक प्रलोभन दाखवून, अडचणीत आणून काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केले आहे. या राज्यात राज्यकर्ते म्हणून कुणीही अमृत पिऊन आलेलं नाही. त्यामुळे शिवसेना-भाजपने राजकीय भ्रष्टाचार सुरू केला असेल तरी या निवडणुकीत जनता या लोकांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, या शब्दात मुंडे यांनी सरकारवर तोफ डागली.

VIDEO : सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप देताना अडवाणींसह भाजप नेते गहिवरले

Published by: Sandip Parolekar
First published: August 7, 2019, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading