गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी धनंजय मुंडेंचं ट्वीट; म्हणाले...

gopinath munde death anniversary : धनंजय मुंडेंनी ट्वीटरवरून वाहिली आदरांजली.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 04:27 PM IST

गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी धनंजय मुंडेंचं ट्वीट; म्हणाले...

मुंबई, 03 जून : दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी आप्पा तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा, जन सामान्यांच्या कल्याणासाठी... सदैव तुमच्या आठवणीत. विनम्र अभिवादन! असं म्हटलं आहे.Loading...

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांना ट्वीटरवरून आदरांजली वाहत भावुक ट्वीट केलं. 2014मध्ये भाजपनं मिळवलेल्या विजयानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण, 3 जून 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला यंदा पाच वर्षे झाली आहे.
मोदींच्या जेम्स बॉण्डची ताकद आणखी वाढली; दिला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा!


काय म्हणाले फडणवीस

गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त परळीमधील गोपीनाथ गड येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुंडे यांचे नेतृत्व अफाट होते. त्यामुळे भाजपला राज्यात हे दिवस आले. मुंडे परिस होते. त्यांनी ज्यांना हात लावला ते मोठे नेते झाले अशा भावना यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

मुंडे साहेबांचे परिश्रम आज कामाला आले. मात्र, हे यश बघायला ते नाहीत याचं दुख: वाटत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या पायाभरणीमुळे आमच्या सारखे नेते म्हणून पुढे आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पश्चिम खोऱ्यातील पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणणे हे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. ते आम्ही पूर्ण करणार आहोत. मराठवाड्याला दुष्काळातून सोडवणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पाइपद्वारे मराठवाड्यातील सर्व धरणांमध्ये पाणी पोहोचवायचे आहे. त्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. कितीही खर्च आला तरी आम्ही आता मागे पडणार नाही अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


‘मुंडे साहेब हाती काहीच उरत नाही’; पंकजांचं भावनिक ट्वीट

युतीचे शिलेदार

गोपीनाथ मुंडे यांना शिवसेना – भाजप युतीचे शिलेदार म्हणून देखील ओळखलं जातं. शिवसेना – भाजपची राज्यात युती करण्यामागे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज देखील शिवसेना – भाजपमध्ये आलेल्या कटुतेवेळी राजकीय वर्तुळात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण काढली जाते. 1999मध्ये युतीचं सरकार राज्यात सत्तेत आलं. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गृहमंत्री म्हणून देखील त्यांची कारकिर्द गाजली होती.


VIDEO : सुशीलकुमार शिंदे ते सलमान खान...बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीला दिग्गजांची हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 03:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...