पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात, पंकजा मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का

पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात, पंकजा मुंडेंच्या वर्चस्वाला धक्का

पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या पॅनलने जिंकली आहे.

  • Share this:

बीड, 09 आॅक्टोबर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या पॅनलने जिंकली आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडेंचा असा सामना रंगला आहे. यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना हरवलं होतं.

सध्या बीडमध्ये होणा-या प्रत्येक निवडणुकीकडे पंकजा विरुद्ध धनंजय म्हणून पाहिले जाते. आज राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरु आहे. यावेळी प्रथमच लोकांमधून सरपंच निवडला जाणार आहे.

First published: October 9, 2017, 2:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading