आम्हीही तुमच्या घरात डोकावून पाहू का? धनंजय मुंडेंचा मोदींवर प्रहार

आम्हीही तुमच्या घरात डोकावून पाहू का? धनंजय मुंडेंचा मोदींवर प्रहार

'शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पाट्ंयावरून वाघाचं चित्र काढून त्याऐवजी चिमणीचं चित्र लावावं' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

  • Share this:

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 12 एप्रिल : परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांची विरेंगाव जालना इथे जाहीर सभा होती. यावेळी त्यांनी शिवसेना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला आहे. 'शिवसेना म्हटलं की लोक आता खालून ओरडतात. ही शिवसेना नाही तर चिवसेना आहे' अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

'5 मंत्रीपदाच्या तुकड्यांसाठी शिवसेना लाचार झाली. त्यामुळे ही शिवसेना नव्हे तर चिवसेना आहे' असं धनंजय मुंडे म्हणाले. 'शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पाट्ंयावरून वाघाचं चित्र काढून त्याऐवजी चिमणीचं चित्र लावावं' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांनाही लक्ष केलं. 'मोदींनी शरद पवारांच्या घरात डोकावलं. आता आम्ही तुमच्या घरात डोकावून विचारायचं का यशोदाबेनचं काय झालं होतं..?' अशा कठोर शब्दात धनंजय मुंडेंनी मोदींवर प्रहार केला.

या सभेमध्ये धनंजय मुंडेंनी शिवसेनेच्या उमेदवारावरही टीका केली. ते म्हणाले की, 'परभणीतील सेनेचा विद्यमान खासदार खासदार नसून परभणीच्या विकासाचा नासदार आहे. अश्या या वाळू माफिया, व्यापाऱ्यांना मारहाण करणाऱ्याला परत निवडून देऊ नका.'

हेही वाचा: एक्सप्रेसवर कार आणि रिक्षाचा भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

माझं राजकीय वजन वाढलं म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागलं-धनंजय मुंडे

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच कलगीतुरा रंगतो. पंकजा मुंडे यांच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पलटवार केला. माझं राजकीय वजन वाढलं त्यामुळेच बहिणीच्या पोटात दुखू लागलं असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला होता.

धनंजय मुंडे म्हणाले, निवडणुकीआधी मी कष्टानं माझ शरीरिक वजन कमी केले. लोकसभेचा आणि त्याचा काय संबंध. पण प्रचार सभेत माझ्या वजनाचा विषय येत आहे. पण माझं राजकीय वजन वाढल म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागलं, कळा निघायला लागल्या आहेत असंही ते म्हणाले होते.

सरकारला अंगावर घेतलं

मला पक्षाने विश्वास टाकून जबाबदारी दिली. माझं काम तुम्ही पाहिले सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारशी दोन हात केले. त्यामूळे मी माझं नाव कमावलं. पण काहींच्या पोटात दुखायला लागलं. राष्ट्रवादी -काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी केज तालुक्यांतील नांदूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

म्हणून अन्याय करणार का?

माझा जन्म मुंडे साहेबांच्या पोटी झाला नाही म्हणून अन्याय करणार का? पंडित अण्णानी लहान भावला मोठं करण्यासाठी अख्खी हयात घालवली त्यांच्या मुलांवर अन्याय करणार कां? दोन बहिणींनी सत्तेत असतांना काय दिलते सांगा नंतर मतदान करा असंही ते म्हणाले होते.

निष्क्रिय भगिनी

दोन्ही बहिणींना दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळी सत्ता असतां काहीच करता आले नाही. या भगिनीं एवढ्या निष्क्रिय आहेत की वारसा हक्काने मिळालेल्या वैद्यनाथ कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज करुन ठेवलं. पालकमंत्री पंकजाताई म्हणायच्या की वैद्यनाथ कारखाना हा गोपीनाथ मुंडेचा आत्मा आहे. त्यांच कारखान्याच्या जागेवर गोपीनाथ गड आहे.

आज शेतकऱ्यांचे पैसे थकवले म्हणून ज्या सरकार मध्ये त्या मंत्री आहेत त्यांच राज्य सरकार ने कायद्यानुसार कारखान्यावर जप्ती आणली परिणामी ही जप्ती स्व.मुंडे साहेबांच्या आत्म्यावर जप्ती आणली. हा त्यांचा अपमान नाही कां? अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

VIDEO : मोदींच्या सभेपूर्वी भाषण रोखल्यानं दिलीप गांधी भडकले, म्हणाले...

First published: April 12, 2019, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading