• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'ताईसाहेब! मोदींना एखादं पत्र लिहिलं तर बरं होईल', पंकजांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

'ताईसाहेब! मोदींना एखादं पत्र लिहिलं तर बरं होईल', पंकजांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित टीका केल्यानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनीही (Dhanajay Munde) लगेच त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे.

 • Share this:
  बीड, 16 एप्रिल: पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित टीका केल्यानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनीही (Dhanajay Munde) लगेच त्यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. एकापाठोपाठ अनेक ट्विट (Tweet) करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचे आरोप खोडून काढले. तसंच ताईसाहेब! एखादं पत्र पंतप्रधानांना लिहून लसीचा पुरवठा वाढवण्याचा आग्रह धरावा, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला. (वाचा -धनंजय मुंडेंविरोधात पंकजा उतरल्या मैदानात, गंभीर आरोपांसह केली घणाघाती टीका) बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्यानं पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. 'बीडमध्ये सत्ताधाऱ्यांना आणि पालकमंत्री यांना फक्त माफियांचं हित माहिती आहे,' अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. तसंच राज्य सरकारने बीडला कमी डोस दिल्याची तक्रारही या पत्रातून पंकजा मुंडे यांनी केली होती. त्याचबरोबर रेमडिसीवरच्या तुटवड्यावरूनही पंकजा मुंडे यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली होती. (वाचा -'मुली उचलून आणण्याची भाषा करणारे, साधूंसाठी आंदोलन करतायेत' NCP ची टीका) मात्र पंकजा मुंडे यांच्या पत्रानंतर लगेचच धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या आरोपांवर स्पष्टीकरण देत पंकजा यांच्यावरच टोलेबाजी केली. धनंजय मुंडे यांनी लसीच्या उपलब्धतेबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. तसंच ऑक्सिजन, रेमडिसीवर आणि लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्यावर टोलेबाजीही केली. पंकजा यांचा ताईसाहेब असा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला. ताईसाहेब, मुख्यमंत्र्यांना व आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढाईत खरोखरच आपली मदत होईल, असं मुंडे म्हणालेत. धनंजय मुंडे यांनी या ट्विटमध्ये राजकारण इतरत्र जरूर करा, पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको असंही म्हटलं.मात्र धनंजय मुंडेंच्या ट्विटनंतर पंकजा यांनीही ट्विट करत त्याला उत्तर दिलं. मी पत्र लिहिनच पण तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही. विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले, असा आरोप त्यांनी केला. तसंच धनंजय मुंडेंनी पंकजांना ताईसाहेब म्हटलं होतं, त्यावर पंकजांनी त्यांचा भाऊ असा उल्लेख केला. एकूणच कोरोनाच्या उपाययोजनांवरून पुन्हा एकदा बीडमधले राजकीय प्रतिस्पर्धी एकमेंकांसमोर उभे ठाकले आहेत. ताई आणि भाऊ यांच्यातील आरोप प्रत्यारोपामध्ये नेमकं कोण सरस हे मात्र भविष्यात कळेलच. मात्र जिल्ह्यातलं वातावरण त्यामुळं पुन्हा तापायला सुरुवात झाली यात शंका नाही.
  Published by:News18 Desk
  First published: