मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्र्यांकडे, धनंजय मुंडेंनी सांगितलं फडणवीस भेटीचं कारण

दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्र्यांकडे, धनंजय मुंडेंनी सांगितलं फडणवीस भेटीचं कारण

Dhananjay Munde meet Devendra Fadnavis

Dhananjay Munde meet Devendra Fadnavis

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dhananjay Munde Devendra Fadnavis meet) यांची भेट घेतली आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dhananjay Munde Devendra Fadnavis meet) यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर या दोघांमध्ये झालेली आणि माध्यमांसमोर आलेली ही दुसरी भेट आहे. याआधी फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे रात्री उशीरा फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले होते. देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचं मुंडे यांनी सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. गोगल गाईमुळे 10 हजार हेक्टर जमिनीतील पीकं खराब झाली आहेत. काल जो निर्णय घेतला त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत होणार नाही. गोगल गाईने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली. आतापर्यंत पंचनामेही झाले नाहीत. आपण तात्काळ पंचनामे करावेत, असं मी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं आहे. दोन व्यक्ती सरकार चालवत होते. आता खातेवाटप झालं नाही. जेव्हा लोकांच्या अडचणी संपतील तेव्हा राज्यात सरकार आलं असं लोकांना वाटेल, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 'शेतकऱ्यांना NDRF पेक्षा दुप्पट मदतीचा निर्णय फसवा', अजितदादांनी सांगितल्या त्रुटी शेतकऱ्यांसाठी सरकारची घोषणा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत शेतकऱ्यांना दिली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा फसवी आणि धुळफेक करणारी असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Dhananjay munde

    पुढील बातम्या