बीड, 13 मे- साहेब देव बप्पाला जावून ही परिस्थिती सांगा त्यांना काही कळत नाही, आणि धनंजय मुंडेंसारखा मुख्यमंत्री करा, म्हणजे आमच्या समस्या त्यांना कळतील, असे म्हणताच मिश्किल शैलीत पवार यांनी दोन्ही हात..उंचावून हो..म्हणून शब्द दिला. उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून घेणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ आता धनंजय मुंडे देखील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री? अशी चर्चा सुरु झाली आहे. यावेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे, रोहित पवार, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार उषा दराडे , माजी आमदार सय्यद सलीम, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर उपस्थिती होते.
बीड जिल्ह्यतील नवगनराजुरी गावांतील चारा छावणीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सांगितल्या त्यावेळी..आश्रुबा काळे या 75 वर्षीय वयोवृद्ध आजोबांनी जनावरं कशी जगवावी...चारा छावणीतील चारा कमी पडतो.. दुष्काळात खूप वाईट परिस्थिती आहे..साहेब. आपण असंच इथून मुंबईला जा आणी त्या देव बप्पाला ही परिस्थिती सांगा, म्हणत देवेंद फडणवीसांवर निशाणा साधला. पण लगेचच या आजोबांनी...पवार साहेब यांना समस्या मांडताना या मुख्यंमत्री महोदयांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजत नाहीत. पंतप्रधान सुद्धा तुमच्या बारामतीत सल्ले घ्यायला येतात. मग एक कराना साहेब.. आमचे प्रश्न मांडणाऱ्या धनंजय मुंडेंनाच मुख्यमंत्री करा, अशी मागणी केली. त्यावेळी शरद पवार यांच्या शेजारी धनंजय मुंडे होते. धनंजय मुंडेंकडे पाहून पवारांनी दोन्ही हात हलवून मिश्कीलपणे करुन टाकू, असे त्या शेतकऱ्याला आश्वासन दिले. कदाचित हे सभे पुरते..मिश्किल आश्वासन असले पण. लोकांच्या मनात आत्ता धनंजय मुंडे मुख्यंमत्री व्हावे, ही गोष्ट पवारांसमोर उघड झाली. नेत्यांवरील प्रेम असो पण. या एकूणच घडलेल्या प्रसंगांची चर्चा सुरु झाली आहे.
यापूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडेंनंतर मी महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात बोलून दाखवलं होतं. आता धनंजय मुंडे सुद्धा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न रंगवत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला पुष्टी मिळाली ती मोठ्या पवारांच्या समोर..
बीड जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यात काय म्हणाले शरद पवार? पाहा हा VIDEO