'जनाची नाही तर मनाची असेल तर CMनी त्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'

'जनाची नाही तर मनाची असेल तर CMनी त्या दोन मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'

'सुरुवातीचे 5 दिवस सरकार कुठे होतं हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांनी खरंतर महाजनादेश यात्रा रद्द करुन पूरग्रस्त ठिकाणी जाऊन काम केलं पाहिजे. मात्र या मुख्यमंत्र्यांना पुन्हा मीच मुख्यमंत्री झालं पाहिजे असं वाटतं.'

  • Share this:

मुंबई 13 ऑगस्ट :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरग्रस्तांसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून पक्षातर्फे धनादेश दिला. मुख्यमंत्र्यांना जनाची नाही तर मनाची वाटत असेल तर त्यांनी त्या दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. गिरीश महाजन आणि सदाभाऊ खोत यांच्याकडे मुंडे यांचा रोख होता. महाजनांचा उल्लेख त्यांनी पिस्तुलराव महाजन असाही केला.

पूरग्रस्तांसाठी केंद्राला मागणार 6 हजार कोटी, मंत्रिमंडळाचे 10 महत्त्वाचे निर्णय

धनंजय मुंडे म्हणाले, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करत 4000 कोटींची रक्कम पहिल्या टप्प्यात दिली पाहिजे. जून 2019 पर्यंत शेतकऱ्यांच थकीत कर्ज व्याजासहित माफ केले पाहिजे. खरवडलेल्या जमिनीसाठी 25 हजार रुपये प्रति एकरी मदत द्यावी. मजुरांना रोख रक्कम द्यावी. 2 दिवस मदतीचा निकष शिथील करण्यात यावा अशा मगाण्याची त्यांनी केल्या.

ते पुढे म्हणाले, सुरुवातीचे 5 दिवस सरकार कुठे होतं हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांनी खरंतर महाजनादेश यात्रा रद्द करुन पूरग्रस्त ठिकाणी जाऊन काम केलं पाहिजे. मात्र या मुख्यमंत्र्यांना पुन्हा मीच मुख्यमंत्री झालं पाहिजे असं वाटतं अशी टीकाही त्यांनी केली.

उल्हासनगरात 5 मजली इमारत कोसळली.. वास्तव्य करत होती 31 कुटुंबे

थोरातांची अमित शहांवर टीका

कोल्हापूरातला महापूर ओसरू लागला आणि राजकारणाला आणखी वेगात सुरूवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चांगलंच धारेवर धरलंय. कोल्हापूर ही अमित शहांची सासुरवाडी आहे. त्यामुळे तरी त्यांनी जास्त मदत करावी फक्त हवाई पाहणी करू नये असा टोलाही त्यांनी शहांना लगावलाय. अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर, सांगली, कराड आणि बेळगावच्या पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली होती.

SPECIAL REPORT: लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन थोरात यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. ते म्हणाले, पूराची परिस्थिती गंभीर आहे. आता पूर ओसरल्यानंतर संकटं मोठी आहेत. असं असलं तरी प्रशासन अद्याप गतीने काम करत नाही. यामुळे स्थानिक लोक नाराज आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हवाई पहाणीपेक्षा अलमट्टी धरणातून लवकर पाणी सोडले असते, तर संकट कमी झालं असतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

मोठं नुकसान झालं तिथं केंद्र सरकारने तात्काळ मदत करावी. पाच हजार मदतीने काहीच होणार नाही. त्यांच पुर्नवसन होणे गरजेचं आहे. संपूर्ण कर्जमाफी झाल पाहीजे. जनावरांसाठी मदत दिली पाहिजे. इचलकरंजीतील कापड उद्योजकांना मदत होणे गरेजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

माणुसकीचं दर्शन.. स्वत: नायब तहसीलदारांनी पाठीवर वाहून नेली अन्नधान्याची पोती

पूरग्रस्त भागात काँग्रेस कंट्रोल रुम तयार करणार असून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे तिथे थांबतील असंही थोरात यांनी सांगितलं.

First published: August 13, 2019, 4:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading