मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली; भावूक Tweet करत लिहिलं, ''अप्पा... काळीज जड होते''

धनंजय मुंडेंची गोपीनाथ मुंडेंना आदरांजली; भावूक Tweet करत लिहिलं, ''अप्पा... काळीज जड होते''

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे.

  • Published by:  Pooja Vichare

बीड, 12 डिसेंबर: भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. गोपीनाथ मुंडे (Goprinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरातून विविध नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली.

धनंजय मुंडे यांनी मुंबई येथील निवासस्थानी प्रतिमेस आदरांजली अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी स्व. अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे, तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा..." असे म्हणताना धनंजय मुंडे भावूक ट्विट केलं आहे. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहताना एक भावूक ट्विट केलंय.

धनंजय मुंडे यांनी सकाळीच गोपीनाथ मुंडे यांनी आज जयंतीनिमित्त ट्विट केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला.

त्यात त्यांनी लिहिलंय, ‘स्वर्गीय अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित-उपेक्षित, शेतकरी-कष्टकरी, ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे. तो जपुयात, पुढे नेऊयात. विनम्र अभिवादन अप्पा…‘

शरद पवारांना धनंजय मुंडेंनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त धनंजय मुंडे यांनी त्यांनाही ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या.

त्यांनी एका ट्टिवटमध्ये लिहिले, पद्मविभूषण आदरणीय पवार साहेब म्हणजे केवळ एक नाव नाही, ते एक कारकीर्द, एक मोहीम आणि एक वसा म्हणून लोकसिद्धत्व प्राप्त झालेले नेतृत्व आहेत. साहेबांना 81 व्या जन्मदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

First published:

Tags: Dhananjay munde