'...सांगा, मी राक्षस कसा?' : 'ताई'बद्दल बोलताना धनंजय मुंडे झाले भावुक

'...सांगा, मी राक्षस कसा?' : 'ताई'बद्दल बोलताना धनंजय मुंडे झाले भावुक

'भर सभेत माझी बहीण मला दुष्ट राक्षस म्हणते. मला संपवण्याची भाषा करते. मी अस काय केलंय?' असं भावुक भाषण करून धनंजय मुंडे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलं.

  • Share this:

परळी, 19 ऑक्टोबर : 'भर सभेत माझी बहीण मला दुष्ट राक्षस म्हणते. मला संपवण्याची भाषा करते. मी अस काय केलंय?' असं भावुक भाषण करून धनंजय मुंडे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपल्याच मतदारसंघात प्रचारसभा घेतली. त्यामध्ये सत्ताधारी भाजप-सेना युतीवर सडकून टीका केली.

दरम्यान दुसरीकडे पंकजा मुंडे प्रचाराच्या शेवटच्या सभेनंतर स्टेजवरच चक्कर येऊन कोसळल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पाहा VIDEO पंकजा मुंडे भरसभेत भोवळ येऊन कोसळल्या

परळीत आपल्या प्रतिस्पर्धी आणि भाजप उमेदवार पंकजा मुंडेंबद्दल बोलताना ते म्हणाले, "भर सभेत माझी बहीण मला दुष्ट राक्षस म्हणते. मी आपल्या मातीतल्या माणसाला मोठा करण्यासाठी झटतोय. मी राक्षसारारखं काय केलंय?" असं म्हणत धनंजय भावुक झाले. "ताई, 10 वर्षांपूर्वी तुम्ही मला भरल्या ताटावरून उठवलंत. मी बाजूला झालो. त्या वेळी तुम्हाला निवडून आणलं म्हणून मी राक्षस का?"

वाचा - धनंजय मुंडेंनी 'राम-लक्ष्मण'ची जोडी फोडण्याचं काम केलं, पंकजा मुंडेंचा घणाघात

"तुम्ही मला संपवण्यासाठी शहांना आणलंत, मोदींना आणलंत, उदयनराजेंना आणलंत आणि राक्षसाचा नायनाट करण्याची भाषा केलीत..." असं बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

Alert मतदानाच्या दिवशी राज्यात कोसळधारा; या जिल्ह्यांत होणार वादळी पाऊस

दरम्यान, परळीत शेवटच्या प्रचार सभेनंतर भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परळीच्या सभेत भाषणानंतर पंकजा स्टेजवरच कोसळल्या. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात ही घटना घडली. कार्यकर्त्यांनी पंकजा यांना सावरलं. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

--------------------------------------------------------------

VIDEO : शेवटच्या सभेत शरद पवारांचा फडणवीसांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 06:46 PM IST

ताज्या बातम्या