'सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नागरिकांना 20 लोकांमध्ये लग्न करण्यास परवानगी द्या', धनंजय मुंडेंची मागणी

'सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नागरिकांना 20 लोकांमध्ये लग्न करण्यास परवानगी द्या', धनंजय मुंडेंची मागणी

या संदर्भात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रदेखील लिहिलं आहे.

  • Share this:

बीड, 04 मे : देशात कोरोनाव्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबण्यात आला. यात आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी दारू विक्रिसाठी परवाणगी देण्यात आली. या सगळ्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील सरकारकडे लग्नासंबंधी एक मागणी केली आहे. या संदर्भात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रदेखील लिहिलं आहे.

सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून नागरिकांना 20 लोकांमध्ये लग्न करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यासंबंधी आपण पत्र पाठवलं असल्याची माहिती बीडमध्ये माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी दिली. खरंतर सध्या लग्नसराईचे दिवस आहे. पण कोरोनामुळे अनेकांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. यावर निदान 20 लोकांमध्ये लग्न लावून देण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे. यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बांधावर डिझेल मिळणार आहे. यासाठी मोबाईल डिझेल व्हॅन तयार करण्यात आली आहे. या सेवेचं उद्घाटन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यात 11 मोबाईल व्हॅन असणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या कृषि अवजारणाचा डिझेलचा प्रश्न आता मिटणार आहे.

आपला देश कोरोनावर नक्की मात करणार, आरोग्य मंत्रलयाकडून दिलासा देणारी बातमी

शेतकऱ्यांनं फोन करताच बांधावर डिझेल पोचवलं जाईल असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. एकीकडे राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये मद्यपींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई आणि पुणे शहरात आजपासून वाईन शॉप खुली करण्यात आली. सगळ्या झोनमध्ये दारू विक्रिसाठी परवाणगी देण्यात आली आहे.

दारूची तलफ भागवण्यासाठी तोबा गर्दी, 2 तासात असं काही झालं की आता होताय पश्चाताप

महाराष्ट्रात 14 रेड झोन..

महाराष्ट्रात एकूण 14 रेड झोन, 16 ऑरेंज झोन ​​आणि 6 ग्रीन झोन आहेत. जोपर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये सलग 21 दिवस नव्याने कोरोनाबाधित एकही रुग्ण सापडणार नाही, तोपर्यंत असा जिल्हा ग्रीन झोन मानण्यात येणार नाही, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव प्रीती सुडान यांनी दिली आहे.

कहर VIDEO: दारूसाठीच्या रांगेचं हे चित्र पाहून विश्वास नाही बसणार

रेड झोन (Red Zone):

- मुंबई (Mumbai)

- पुणे (Pune)

- ठाणे (Thane)

- नाशिक (Nashik)

-पालघर (Palghar)

- नागपूर (Nagpur)

- सोलापूर (Solapur)

- यवतमाळ (Yavatmal)

- औरंगाबाद (Aurangabad)

- सातारा (Satara)

- धुळे (Dhule)

- अकोला (Akola)

- जळगाव (Jalgaon)

- मुंबई उपनगर ( Mumbai Suburban)

ऑरेंज झोन (Orange Zone)

​- रायगड (Raigad)

- अहमदनगर (Ahmednagar)

- अमरावती (Amravati)

- बुलडाणा (Buldhana)

- नंदुरबार (Nandurbar)

- कोल्हापूर (Kolhapur)

- हिंगोली (Hingoli)

- रत्नागिरी (Ratnagiri)

- जालना (Jalna)

- नांदेड (Nanded)

- चंद्रपूर (Chandrapur)

- परभणी (Parbhani)

- सांगली (Sangli)

- लातूर (Latur)

-भंडारा ( Bhandara)

- बीड ( Beed)

Green Zone:

- उस्मानाबाद (Osmanabad)

- वाशिम (Washim)

-सिंधूदुर्ग (Sindhudurg)

- गोंदिया (Gandia)

- गडचिरोली (Gadchiroli)

- वर्धा ( Wardha)

संपादन - रेणुका धायबर

First published: May 4, 2020, 7:21 PM IST

ताज्या बातम्या