Home /News /maharashtra /

धनंजय मुंडेंना मोठा धक्का, काँग्रेसने भाजपसोबत केला घरोबा, सत्ता स्थापन!

धनंजय मुंडेंना मोठा धक्का, काँग्रेसने भाजपसोबत केला घरोबा, सत्ता स्थापन!

 राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

    बीड, 26 जानेवारी :  राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांची प्रतिष्ठापणाला लागलेल्या केज नगरपंचायतीमध्ये (kej nagar panchayat election) राष्ट्रवादीला (ncp) काँग्रेसचा धक्का बसला आहे.  काँग्रेस (congress and bjp alliance ) आणि भाजप पुरस्कृत जनविकास आघाडी एकत्र आले असून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्ह्य अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती मात्र राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. या संदर्भात खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी केजच्या विकासासाठी एकत्र आली असून नगरपंचयातीमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे आदित्य पाटील व जनविकास आघाडीचे हारून इनामदार यांनी शिवनेरी बंगला येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषित केले होतं. (पांढऱ्या केसांमुळे उडवली जायची खिल्ली, आता त्याच केसांचे आहेत अनेक चाहते) केज नगरपंचयात निवडणुकीत जनविकास आघाडी 8, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 3 तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. परंतु, यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता. परंतु, यावर आता पडदा पडला असून केजच्या विकासासाठी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडी व काँग्रेस एकत्र आले असून सत्ता स्थापन केली आहे. (Bollywood celebrity करतायेत मुंबई पोलिसांचं कौतुक; खास आहे कारण) 'आपलं गाव आपलं सरकार' ही संकल्पना घेऊन आम्ही आता गावात विकास काम करू असेही यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले. यावेळी अंकुशराव इंगळे, पशुपतीनाथ दांगट, प्रकाश भन्साळी, शकील इनामदार, दिलीप गुळभिले, हाजी मौला सौदागर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या