मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी हा तर पळपुटेपणा', धनंजय मुंडेंची पंकजांवर जहरी टीका

'पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी हा तर पळपुटेपणा', धनंजय मुंडेंची पंकजांवर जहरी टीका

 भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत एकही मतदार उमेदवार निवडणुकीत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला

भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत एकही मतदार उमेदवार निवडणुकीत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला

भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत एकही मतदार उमेदवार निवडणुकीत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला

बीड, 20 मार्च : 'पराभवाची अब्रू वाचवण्यासाठी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्र्यांचा पळपुटेपणा केला' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जहरी टीका केली. बीड जिल्हा बँकेची (Beed District Bank elections) आज आठ जागांसाठीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली.

'सहकार मंत्र्यांनी यांनी जिल्हा बँक संदर्भात जो निर्णय दिला. त्यानिर्णया विरोधात माजी मंत्री हाय कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. हायकोर्टाने सहकार मंत्र्यांना दिलेला निर्णय कायम ठेवला. हायकोर्टाने दिलेला निर्णय भाजपाच्या माजी मंत्र्यांना मात्र मान्य झालं नाही. भाजपाकडे मतदार जास्त असताना देखील बहिष्कार टाकणं म्हणजे, यांचे मतदार यांचं ऐकत नाहीत, अशी स्थिती दिसून येत आहे. तसंच 21 तारखेला निकालाच्या दिवशी जी नामुष्की ओढवणार होती. ती थोडीशी अब्रू वाचविण्यासाठी भाजपने पळपुटेपणापणा केला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

VIDEO: मुंबईत मास्क न घातल्यानं दंड मागितला असता महिलेची मार्शलला जबरदस्त मारहाण

शुक्रवारी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत एकही मतदार उमेदवार निवडणुकीत सहभागी होणार नाही, असा निर्णय घेतला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी हे वक्तव्य केल आहे. (Pankaja Munde boycotts Beed District Bank elections)

बीड जिल्हा बँकेच्या 19 पैकी 9 जागांवर निवडणूक होत आहे. निवडणुकीतून मतदानाच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माघार घेतली असल्याची चर्चा आहे पण तरीही महाविकास आघाडीही निवडणूक अत्यंत ताकतीने लढणार असल्याचे सांगितले. एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे.

Sachin Vaze यांनी रेकीसाठी वापरली मर्सिडीज कार, नवी मुंबई कनेक्शन उघड!

असाही सूर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या 6 जागा लढवत आहेत. या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने सामोरे जात असून, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून घ्यावे, जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाच्या कारभाराला पाहता एकूण मतदानाच्या 90 टक्के मतदान आघाडीच्या उमेदवारांना मिळेल, असा विश्वास आघाडीचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Beed news, Dhananjay munde, Pankaja munde, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे