'मुख्यमंत्री खोटं बोलताहेत, त्यांना WhatsApp विद्यापीठाने माहिती दिली का?'

मुख्यमंत्र्यांनी जलसिंचनाची जी आकडेवारी दिली होती ती आकडेवारी खोटी असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून केलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 05:46 PM IST

'मुख्यमंत्री खोटं बोलताहेत, त्यांना WhatsApp विद्यापीठाने माहिती दिली का?'

मुंबई 2 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या महाजनादेश यात्रे दरम्यान सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा पाठा वाचून दाखवत आहेत. यात्रेची सुरुवात होत असताना त्यांनी सरकारच्या कामाचे अनेक दावे केले होते. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मुख्यमंत्र्यांनी जलसिंचनाची जी आकडेवारी दिली होती ती आकडेवारी खोटी असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून केलीय. मुख्यमंत्री महोदय, खोटं बोलण्याचीही एक मर्यादा असते. जलसिंचनाची आकडेवारी तुम्ही WhatsApp विद्यापीठाकडून घेतली का?असा खोचक सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

VIDEO : ईडीच्या चौकशीबाबत राज ठाकरेंची पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...

अमरावतीत केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या 5 वर्षात जलसिंचन 50 हजार हेक्टरवर झाल्याचा दावा केला होता. जे काम गेल्या पन्नास वर्षांमध्ये झालं नाही ते काम आम्ही केलं असा दावाही त्यांनी केला. शेती, पाणी, वीज, उद्योग, पायाभूत सुविधा अशा सगळ्या क्षेत्रात सरकारने भरघोस काम केलं असंही ते म्हणाले.

खूप कामं झाली असली तरी अजून खूप कामं करायची आहेत असंही त्यांनी सांगितलं. आता मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांची शहानिशा विरोधी पक्षांनी सुरू केलीय. 1 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अमरावतीजवळच्या गुरुकुंज मोझरी इथून सुरू झाली. राज्यभर ही यात्रा फिरणार असून निवडणुक जाहीर होण्याआधीची प्रचाराची एक फेरी ते पूर्ण करणार आहेत.

Mission Mangal मराठीत रिलीज करण्यास मनसेचा विरोध, 'हे' आहे कारण

Loading...

मुख्यमंत्रीपद दिलं तर सोडणार का?

भाजपचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना सध्या एक प्रश्न हमखास विचारला जातोय. तो प्रश्न म्हणजे तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहात का? या प्रश्नावर त्यांनी अनेकदा उत्तरं दिलीत. मात्र पुन्हा पुन्हा त्यांना तोच प्रश्न विचारण्यात येतोच. आज पुण्यातही त्यांना पत्रकारांनी  तो प्रश्न विचारलाच. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही असं त्यांनी नेहमीप्रमाणं स्पष्ट केलं. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का? असा प्रश्न पुन्हा विचारला त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी गुगलीच टाकला. ते म्हणाले, मग काय सोडणार काय? दादांच्या या उत्तरावर सगळेच अवाक् झाले.

'शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, करावं तसं भरावं लागतं'

चंद्राकांत पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे की नाही हे लोक ठरवतील. कुणीही मुख्यमंत्री होऊ शकतो असंही ते म्हणाले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीला  40 टक्के मतदारांनी शरद पवार यांना नाकारल्याचंही त्यांनी सांगितलं. हाऊस फुल्ल चा बोर्ड लागला असला तरी थिएटर वाल्यांकडे स्वतःची 10 तिकिटे असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

VIP मोबाईल नंबर देणारं रॅकेट उद्ध्वस्त; नेते,अभिनेत्यांना कोट्यवधींचा गंडा

निवडणूक आयोगाने ठरवलं तर हात वर करून आवाजी मतदानाला ही भाजप तयार आहे.मतपत्रिकेवरही लढू, कशावरही लढलो तरी आम्हीच निवडणूक जिंकू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात जागावाटपाचं सूत्र ठरलंय. 50-50 असं होईल.शक्यतो विनिंग  सिटिंग बदलणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 05:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...