'करून दाखविले म्हणणार्‍यांच्या 'मातोश्री'बाहेर साचलं पाणी, मुंबापुरीची केली तुंबापुरी'

'करून दाखविले म्हणणार्‍यांच्या 'मातोश्री'बाहेर साचलं पाणी, मुंबापुरीची केली तुंबापुरी'

विशेष म्हणजे करुन दाखविले म्हणणार्‍यांच्या 'मातोश्री'बाहेर पाणी साचलं आहे. मुंबापुरीची पार तुंबापुरी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 जुलै- पावसामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गेल्या दोन दिवसांपासून ठप्प झाली. रस्त्यावर पाणी तुंबले आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे, मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा बंद आहे. चार दिवसांत 40 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे करून दाखविले म्हणणार्‍यांच्या 'मातोश्री'बाहेर पाणी साचलं आहे. मुंबापुरीची पार तुंबापुरी केली आहे. मुंबई तुंबली असताना फक्त पाणी साचले म्हणणारे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचाही विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईला स्मार्ट सिटी बनविताना मुंबईकरांचे हाल केले जात आहेत. मुंबईच्या सध्याच्या परिस्थितीला राज्य सरकार आणि मुंबई महापालिकाच जबाबदार असल्याचा असाही आरोपही मुंडेंनी केला आहे.

नालेसफाईचे 200 कोटी कुणाच्या खिशात गेले...

पावसामुळे मुंबई, पुणे, ठाणेसह राज्याच्या विविध भागात जनजीवन ठप्प झाले आहेत. या संदर्भात धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत नियम 289 अन्वये तातडीच्या चर्चेत लक्ष वेधले. मुंबईत नालेसफाईवर केलेले 200 कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. मुंडेंनी सांगितले की, मुंबईमध्ये 26 जुलै, 2005 च्या घटनेनंतर पर्जन्य जलवाहिन्यांवर हजारो कोटी खर्च करण्यात आले होते. तरीही या परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. नालेसफाईवर गेल्या 10 वर्षांत 3 ते 4 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. पैसा नेमका कुठे जातो, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

सरकार चौकशीला का घाबरते?

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी मागील चार वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, सरकार चौकशीला का घाबरते? असा प्रश्न उपस्थित करतानाच मुंबई महापालिका ही निवडणुकीची संस्था आहे, असा सत्ताधार्‍यांचा दृष्टीकोन असल्यामुळे मुंबईकरांना वेठीस धरले जात असल्याची खोचक टीका मुंडे यांनी केली आहे.

करून दाखविले म्हणणार्‍या उद्धव ठाकरेंवर निशाणा..

करून दाखविले म्हणणार्‍यांच्या 'मातोश्री' घराबाहेर पाणी साचले आहे, यांनी करून नाही दाखवले तर मुंबईला भरुन दाखवले, अशा शब्दात मुंडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुर्दाड सरकार! तडे गेलेल्या 'या' धरणाला ताडपत्रीची ठिगळं, इतर टॉप 18 बातम्या

First published: July 4, 2019, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading