धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला असून दोन दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जून- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला असून दोन दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर आज पहाटे दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती मिळाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथे नियोजित जगमित्र शुगर मिल साठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा वादीतर्फे करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्या ठिकाणी या प्रकरणावर आज सुनावणी झाली. तरी पोलिसांनी पहाटेच बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली. या प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्याच बरोबर आज सकाळी दाखल झालेल्या गुन्ह्याही आता स्थगिती मिळाली आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा सरकारचा हा डाव असल्याची चर्चा होती मात्र धनंजय मुंडे यांना कोर्टाने दिलासा दिल्यामुळे ते पुन्हा एकदा अधिवेशनात आक्रमक पणे सरकारवर जनतेच्या प्रश्नासाठी तुटून पडतील अशी भावना व्यक्त केल्या जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे धनंजय मुंडे यांनी स्वागत केले असून सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्रिपदासंदर्भात उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

First published: June 14, 2019, 2:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading