धनंजय महाडिकांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागील कारण, म्हणाले...

धनंजय महाडिकांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागील कारण, म्हणाले...

महाडिक यांनी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 29 मे : कोल्हापूरमधील राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक यांनी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. त्यामुळे धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आता धनंजय महाडिक यांनी याबाबत खुलासा केला आहे.

'साखर कारखान्यांच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारकडून साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन दिलं जाणार आहे. पण काही कारखान्यांना या योजनेत स्थान देण्यात येणार नव्हतं. यासंदर्भातच मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. आजही अनेक कारखानदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. मी भाजपमध्ये जाणार ही अफवा आहे. भविष्यातही मी राष्ट्रवादीच राहणार आहे,' अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली आहे.

दरम्यान, धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. या भेटीत महाडिकांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात होतं. पण महाडिकांनी यामध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.

VIDEO: भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर धनंजय महाडिकांनी दिलं उत्तर

First published: May 29, 2019, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading