'काल मला जग सोडून जावं वाटलं', धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याची व्हिडिओ क्लिप छेडछाड केलेली असल्याचं सांगत धनंजय मुंडेंनी सर्व आरोप फेटाळून लावले.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 12:58 PM IST

'काल मला जग सोडून जावं वाटलं', धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

बीड़, 20 ऑक्टोबर : पंकजा मुंडेंबद्दल वादग्रस्त वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी ही व्हिडिओ क्लिप एडिट केली असल्याचं म्हटलं. तसेच व्हिडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेल्यावर ती दाखल करून घेतली नाही असंही ते म्हणाले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी मला काल जग सोडून जावं असं वाटत असल्याचं ते म्हणाले. यावेळी भावनिक झालेल्या धनंजय मुंडे यांना अश्रू रोखता आले नाहीत. व्हायरल क्लिपमध्ये जे काही आहे ते मी बोललो असेल तर स्वत:ला संपवून घेईन. मला माझी स्वत:ची चिंता आहे. मी बहिणीचं नातं पाळणारा माणूस आहे. मला निवडणुकीच्या निकालाची काळजी नाही तर मला घरातल्या नात्यांची चिंता आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले.

वादग्रस्त वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर परळीत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, राज्य महिला आयोग धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सुमोटो दाखल करणार आहे. तसेच ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई कऱण्यात येईल असंही राज्य महिला आयोगानं म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनी केज तालुक्यातील विंडयाच्या सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाला घेराव घालत घोषणाबाजीही केली. यामुळे परळीत ऐन निवडणुकीत मतदानापूर्वी तणावाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

Loading...

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. यात त्यांनी म्हटलं की, शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन चुकीचं वक्तव्य केल्याचे आरोप फेटाळून लावले.

पंकजा मुंडे यांना भर सभेत भोवळ

भाजपच्या नेत्या आणि परळीतील उमेदवार पंकजा मुंडे यांना आपल्या प्रचाराच्या अखेरच्या सभेत भोवळ आली. भोवळ येऊन स्टेजवर कोसळलेल्या पंकजा मुंडे यांना नंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या बहीण आणि खासदार प्रितम मुंडे यांनी माहिती दिली आहे.

'सोशल मीडियातील काही गोष्टींमुळे ताई अस्वस्थ आहेत. साधा आणि सरळ स्वभाव असल्याने तिला हे सगळं सहन होत नाही. हे लोक प्रचंड घाणेरडं वागत असल्यानं ताईंना ते सहन झालं नाही. काल रात्रीपासूनच त्या अस्वस्थ होत्या. ताईंनी सांगितलंय की आता सगळ तुमच्या हातात आहे,' अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रितम मुंडे यांनी दिली आहे.

VIDEO : शेवटच्या सभेत शरद पवारांचा फडणवीसांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 12:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...