स्वगृही परतण्याचा मार्ग खुला राज्यातील 38 साखर कारखान्याकडे सुमारे 1 लाख 31 हजार ऊसतोड कामगार आहेत. राज्य सरकारने ऊसतोड मजुरांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शासनाने यासंबंधीत आदेश काढून ऊसतोड मजुरांना स्वगृही पाठवण्याच्या साखर कारखान्यांना सूचना दिल्या आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून सर्व मजुरांना घरी पोहोचवण्याची जबाबदारी कारखान्याची आहे. मजुरांना घरी पाठवण्याआधी त्यांची वैद्यकीय तपासणी करून करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांचा मुद्दा 'News18 लोकमत' ने सातत्याने लावून धरला होता. गेल्या 15 दिवसांपासून ऊसतोड मजूर घरी जावे, या संदर्भात बातम्यातून वास्तव परिस्थिती जगासमोर आणली होती. हेही वाचा..भाडेकरुंना दिलासा, राज्य सरकारने घरभाड्याबाबत घरमालकांना दिले आदेश संयम सुटला...आम्हाला गोळ्या घाला, नाही तर एकदाचं घरी जाऊ द्या दुसरीकडे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातले तब्बल दीड लाख ऊसतोड मजूर अडकून पडले आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हे मजूर अडकले आहेत. लॉकडाऊनमुळे काम बंद झालं, त्यांची कमाई बंद झाली त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. इथे राहून आम्ही करायचं तरी काय? आता गोळ्या घातल्यातरी आम्ही इथे राहू शकत नाही लहान मूलं गावाकडे आहेत ती उपाशी मरत आहेत, इथे आम्हला दिलेलं रेशन संपले, जनावरं उपाशी मरत आहेत, रात्री पावसाने सगळी पाल उडून गेली, उघडयावर अलोत त्यामुळं गावाकडे जाऊ, भलेही पोलिसांनी रस्त्यात गोळ्या घेतल्या तरी आता आम्ही थांबू शकत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कारखाना बंद होऊन 15,20 दिवस झाले आहेत. आमचं काही झालं तर त्याला जबाबदार कोण असा सवालंही त्यांनी केला. बीड जिल्हयातील 3000 ऊसतोड मजूर सांगली जिल्हयातील पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना कडेगाव येथे 20 दिवसांपासून अडकून पडले आहेत.पंकजा मुंडे यांनी 14 तारखेपर्यंत थांबा म्हणून विनंती केली होती, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. गावाकडे आमची लहान मूलं आणि वयोवृद्ध माणसं वाट पाहत आहेत. संपादन- संदीप पारोळेकरमाझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर!
तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा. pic.twitter.com/Vg4sjrULOs — Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 17, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.