'कभी तू चायवाला लगता है, कभी चोर चौकीदार', धनंजय मुडेंचा मोदींवर प्रहार

'कभी तू चायवाला लगता है, कभी चोर चौकीदार', धनंजय मुडेंचा मोदींवर प्रहार

धूलिवंदनाच्या शुभेच्छा देताना धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदींना एका कवितेतून चिमटा काढला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मार्च : धूलिवंदनाच्या मुहूर्तावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. धूलिवंदनाच्या शुभेच्छा देताना धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदींना एका कवितेतून चिमटा काढला आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटरवर एक कविता शेअर करत म्हटलंय की, "कभी तू फकीर लगता है कभी आवारा लगता है कभी तू चायवाला लगता है कभी चोर चौकीदार लगता है... हमेशा अपना रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं! बुरा ना मानो होली है..."

धनंजय मुंडे यांनी केलेल्या या टीकेला आता भाजपकडून कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहावं लागेल.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून 'चौकीदार' या शब्दावरून राजकारण तापलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 'मैं भी चौकीदार' ही मोहीम राबवून उत्तर देण्यात आलं आहे. या मोहिमेच्या अंतर्गतच बुधवारी पंतप्रधान मोदींनी देशभरातील लाखो चौकीदारांशी संवाद साधला आहे. तसंच राहुल गांधींच्या आरोपालाही उत्तर दिलं आहे.

'चौकीदार चोर है' ही मोहीम सुरक्षारक्षकांचा अपमान करण्यासाठी आहे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

'चौकीदार चोर है'

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी कंपनी 'एचएएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे. आणि यामुळेच राहुल गांधी यांनी थेट मोदींना लक्ष्य करत त्यांच्यावर 'चौकीदार चोर है' असा हल्ला चढवला आहे.

मोदींकडून जोरदार प्रत्युत्तर

राहुल गांधींचा 'चौकीदार चोर है'चा आरोप उलटवून लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मैं भी चौकीदार' असं म्हणत आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नावात आठवडाभरापूर्वी बदल केला आहे. 'चौकीदार नरेंद्र मोदी' असं मोदींच्या ट्विटर अकाऊंटचं नाव ठेवण्यात आलं आहे. अमित शहांनीही ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार असं लिहिलं आहे.

SPECIAL REPORT: सांगली कुणासाठी चांगली?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2019 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading