मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'आदित्य ठाकरेंचा तो शब्द प्रचंड वेदना देणारा, भावना आणि कर्तव्यामध्ये अडकलो होतो, पण..', शिंदे गटातील खासदाराची व्यथा

'आदित्य ठाकरेंचा तो शब्द प्रचंड वेदना देणारा, भावना आणि कर्तव्यामध्ये अडकलो होतो, पण..', शिंदे गटातील खासदाराची व्यथा

धैर्यशील माने हे ठाकरे कुटुंबासोबतच्या संबंधांवर बोलताना म्हणाले, की प्रचंड वेदना देणारा हा कलह आहे. भावनिक एका बाजूला आणि कर्तव्य एका बाजूला अशा दोन्ही प्रश्नात मी अडकलो होतो.

धैर्यशील माने हे ठाकरे कुटुंबासोबतच्या संबंधांवर बोलताना म्हणाले, की प्रचंड वेदना देणारा हा कलह आहे. भावनिक एका बाजूला आणि कर्तव्य एका बाजूला अशा दोन्ही प्रश्नात मी अडकलो होतो.

धैर्यशील माने हे ठाकरे कुटुंबासोबतच्या संबंधांवर बोलताना म्हणाले, की प्रचंड वेदना देणारा हा कलह आहे. भावनिक एका बाजूला आणि कर्तव्य एका बाजूला अशा दोन्ही प्रश्नात मी अडकलो होतो.

नवी दिल्ली 13 ऑगस्ट : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयापासून आदित्य ठाकरे यांचे आरोप आणि संजय शिरसाट यांची नाराजी या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी वारंवार बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर प्रतिक्रिया देताना धैर्यशील माने म्हणाले, की गद्दार हा शब्द वेदना देणारा आहे.

धैर्यशील माने हे ठाकरे कुटुंबासोबतच्या संबंधांवर बोलताना म्हणाले, की प्रचंड वेदना देणारा हा कलह आहे. भावनिक एका बाजूला आणि कर्तव्य एका बाजूला अशा दोन्ही प्रश्नात मी अडकलो होतो. पण मी भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व दिलं. एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली आहे, असंही ते म्हणाले.

'दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ...' अजितदादांचा शिंदे-फडणवीसांना सणसणीत टोला

उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नव्हते का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की उद्धव साहेबांची तब्येत हा सगळ्यात मोठा लॅकिनो होता. तब्येतीमुळे अडचणी आल्या हे नाकारता येणार नाही. तसंच त्याआधीच कोणी कोणाला भेटत नव्हतं कारण कोरोनाचा काळ होता. मात्र, उद्धव साहेबांनी कोरोनाच्या काळात प्रभावी काम केलं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुकही केलं.

भाजपसोबत गेलेल्या पक्षांना भाजप संपवत आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, की भाजप शिवसेना युतीनेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आता जी युती झाली ती आयडॉलॉजी एकत्र असणारी युती आहे. महाविकास आघाडीसोबत अनैसर्गिक युती होती. एकनाथ शिंदे शिवसेना ताब्यात घेणार आहेत हे माहिती होते का? या प्रश्नावर ते म्हणाले, की एकनाथ शिंदे यांना शिवसेना हायजॅक करायची नाही . शिवसेनेला त्यांचा हक्क मिळावा म्हणून ते हा लढा देत आहेत.

CM Eknath Shinde in Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर पूरग्रस्तांना न्याय मिळणार का?

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट नाराज आहेत, याबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की मंत्रीमंडळाबाबत चर्चा होताना एखाद्या बाबतीत नाराजी असणं साहजिक आहे. सगळ्यांचं समाधान एकाच वेळेला होऊ शकत नाही तपास यंत्रणाच्या दबावापोटी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला का? असं विचारला असता ते म्हणाले, की माझं Affidavit वाचलं तर कळेल माझ्यावर कर्ज किती आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Uddhav thackeray