मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साखरसम्राट आमदार पुत्राला मुंबईत बेड्या, बनावट कागदपत्र दाखवून मिळवलं ITC

साखरसम्राट आमदार पुत्राला मुंबईत बेड्या, बनावट कागदपत्र दाखवून मिळवलं ITC

 बनावट पावत्यांच्या आधारावर मिळवलं सुमारे 520 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट

बनावट पावत्यांच्या आधारावर मिळवलं सुमारे 520 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट

बनावट पावत्यांच्या आधारावर मिळवलं सुमारे 520 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 14 नोव्हेंबर: मराठवाड्यातील प्रख्यात साखरसम्राट आणि गंगाखेडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा मुलगा सुनील गुट्टे याच्यालह दोघांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी ही अटक झाली आहे. दुसऱ्या आरोपीचं नाव विजेंद्र विजयराज रांका असं आहे. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बनावट पावत्यांच्या आधारावर सुमारे 520 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टे यांच्यावर आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनायाने (डीजीजीआय) ही कारवाई केली आहे. सुनील गुट्टेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हेही वाचा... दिवाळीच्या दिवशी नवनीत राणांचे पती कारागृहात, फडणवीसांनी ठाकरे सरकारला सुनावले सुनील गुट्टे हे हायटेक इंजिनीअरिंग लिमिटेडचे संचालक आहेत. कागदपत्रांमध्ये फेरफार करून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसी मिळवल्याचा आरोप सुनील गुट्टे यांच्यावर आहे. सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडने अंदाजे तीन हजार कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात 520 कोटींचा आयटीसी समाविष्ट आहे. या बोगस बिलांचे जाळे नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरुग्राम, मीरत, अहमदाबाद आणि कोलकातापर्यंत पसरले आहे. देशभरात बनावट पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतल्याप्रकरणी सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेडची मुख्य भूमिका आहे. सुनील हायटेक इंजिनीअर्स लिमिटेड ही संपूर्ण भारतात बनावट आयटीसी कार्टेलमध्ये सहभागी प्रमुख घोटाळेबाज कंपन्यापैकी एक असल्याचे जीएसटी विभागानं म्हटलं आहे. हेही वाचा..धक्कादायक! ऐन दिवाळी दिवशी जिल्हाध्यक्षाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पंढरपुरात खळबळ विजेंद्र विजयराज रांकांनाही अटक सुनील गुट्टेशिवाय डीजीजीआयने ओशिया फेरो एलॉय प्रायव्हेट लिमिटेडच्या विजेंद्र विजयराज रांका यांनाही अटक केली आहे. या कंपनीवरही बोगस व्यवहाराचा आरोप आहे. वस्तूंचा संपूर्ण पुरवठा न करताच 1371 कोटी रुपयांच्या बिलांची देवाणघेवाण करण्यात आली. त्यात 209 कोटींच्या आयटीसीच्या लाभाचा समावेश आहे.
First published:

Tags: Maharashtra, Marathwada

पुढील बातम्या