सच्चा लोकसेवक! 10 वर्षे नगरसेवक... जिथं ट्रस्टी होते तिथंच आज आहे सेक्युरिटी गार्ड

सच्चा लोकसेवक! 10 वर्षे नगरसेवक... जिथं ट्रस्टी होते तिथंच आज आहे सेक्युरिटी गार्ड

नागपुरात तब्बल 10 वर्षे नगरसेवक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी असे अनेक पदे भूषविणाऱ्या एका सच्चा सेवकाला आयुष्याच्या संध्याकाळी हलाखीचं जीवन जगावं लागत आहे.

  • Share this:

नागपूर, 18 जुलै: सध्याच्या राजकारणात साधा ग्रामपंचायत सदस्य असला तरी तो आलिशान कारमधून फिरतो. सर्व सुविधा असलेल्या बंगल्यात राहतो. त्याच्या हातात दोन-दोन महागडे फोन असतात. मात्र, नागपुरात तब्बल 10 वर्षे नगरसेवक, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी असे अनेक पदे भूषविणाऱ्या एका सच्चा सेवकाला आयुष्याच्या संध्याकाळी हलाखीचं जीवन जगावं लागत आहे.

हेही वाचा...भाजपचे महापौर आणि नगरसेवकाला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्लान, आरोपीचे बड्या नेत्यांशी संबंध

देवराव तिजारे असं या सच्चा सेवकाचं नाव आहे. राजकारणात प्रामाणिकपणे जणसेवा करणारे देवराव आज वयाच्या 72 व्या वर्षी जिथं ट्रस्टी होते. म्हणजेच नागपूर सुधार प्रन्यास येथे सेक्युरिटी गार्ड (चौकीदार) आहेत.

सध्या राजकारणी आणि पैसा असं जणू समीकरणच बनलं आहे. पुढारी कोणताही असो, तो आधी गडगंज संपत्ती जमा करतो. मात्र, नागपूरचे देवराव तिजारे हे याला अपवाद ठरले आहेत. देवराज हे वयाच्या 19 वर्षी नागपूर महापालिकेचे नगरसेवक झाले होतो. एवढंच नाही तर त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. नागपूर सुधार प्रन्यासचे एक वेळचे ट्रस्टी होते. मात्र, प्रामाणिकपणे लोकसेवा करणाऱ्या देवराव तिजारे यांना मात्र, आज सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करून आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करव्या लागत आहे. कारण, देवराव यांनी स्वतःसाठी नाही की कुटुंबासाठी काहीच मिळवलं नाही, जे मिळवलं ते लोकांसाठी.

एकेकाळी शरद पवार, दत्ता मेघे, सतीश चतुर्वेदी, श्रीकांत जिचकार अशा महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेत्यांसोबत काम करणारे देवराव आज एका छोट्याशा प्लॉटवर बांधलेल्या दोन खोल्यांच्या घरात राहातात. कर्ज काढून बनवलेल्या या घरावर रंगरंगोटी करायला ही आज देवराव यांच्याकडे पैसे नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे.

हेही वाचा...भाजपमध्ये नारायण राणेंची स्थिती म्हणजे 'ना घर का ना घाट का' अशी, सेनेचा पलटवार

काय म्हणतात देवराव?

विविध राजकीय मंच गाजवणारे देवराव तिजारे चौकीदार म्हणून काम करताना त्यांना वाईट वाटत नाही. पण, ज्यांच्यासाठी आयुष्य खर्ची घातलं तेच पक्ष आणि सोबतचे नेते उंचीवर जाऊन मला विसरले, याची खंत वाटत असल्याची त्यांची भावना देवराव यांनी बोलून दाखवली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 18, 2020, 3:51 PM IST

ताज्या बातम्या