मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...त्यांची रात्रीची उतरली नसेल, फडणवीस यांचं सेनेच्या आमदाराला सडेतोड उत्तर

...त्यांची रात्रीची उतरली नसेल, फडणवीस यांचं सेनेच्या आमदाराला सडेतोड उत्तर

कोरोनाचे (Corona) जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या तोंडात कोंबले असते' असं वादग्रस्त विधान...

कोरोनाचे (Corona) जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या तोंडात कोंबले असते' असं वादग्रस्त विधान...

कोरोनाचे (Corona) जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या तोंडात कोंबले असते' असं वादग्रस्त विधान...

नागपूर, 18 एप्रिल : 'कोरोनाचे (Corona) जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या तोंडात कोंबले असते' असं वादग्रस्त विधान करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Shivsena Mla Sanjay Gaikwad ) यांना अखेर भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.  'गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल म्हणून ते तसे बोलले असतील', असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

'कसं आहे, संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल. त्यामुळे त्यांनी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेतली असावी. त्यांना माझ्या तोंडात कोरोना विषाणू टाकायचे असेल तर त्यांनी नीट मास्क व हॅन्डग्लोस  घालावे कारण रात्रीची घेणाऱ्यांसाठी कोरोना विषाणू अधिक घातक असतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी गायकवाड यांना सणसणीत टोला लगावला.

काय म्हणाले गायकवाड?

संजय गायकवाड यांनी केंद्रातील सरकारवर टीका करताना अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. तुमच्या सरकारमुळं लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते. अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

बुलडाण्यात भाजप-शिवसैनिक भिडले

दरम्यान, आज बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान  संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी पोहोचलेल्या भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. शिवसेना नेते विजयराज शिंदे यांच्या सहित तीन ते चार भाजप कार्यकर्त्यांवर शिवसैनिकानी हल्ला चढवला.

IPL 2021 : पॉईंट्स टेबल, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप, आयपीएलमध्ये RCB चा दबदबा

शिवसैनिकांचा आरोप आहे की, भाजपाचे पदाधिकारी आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदारपुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यात दोन्ही गटात पकडापकडी झाली. शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप करीत आहे.

BREAKING : ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पोलिसांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही गटाना वेगळे करण्यात आले. भाजप नेते योगेंद्र गोडे तथा विजयाताई राठी, प्रभाकर बारे, सोनू बाहेकर, करण बेंडवाल तसंच अनेक भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

तर शिवसैनिकांमध्ये श्रीकांत गायकवाड, बाळासाहेब धुड, बंडू आसाबे, संदीप पुराणिक तसंच अनेक जण सहभागी होते. शिवसैनिकांच्या आक्रमकतेपुढे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पळती भुई थोड़ी झाली, असा दावा शिवसेनेने केला आहे. तर शिवसेनेची दादागिरी या घटनेतून समोर आली आहे, असे भाजपचं म्हणणं आहे.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis