• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • फडणवीसांचे जवळचेच नेते लेडीज बारमध्ये जातात, संजय गायकवाडांचं जशास तसे उत्तर

फडणवीसांचे जवळचेच नेते लेडीज बारमध्ये जातात, संजय गायकवाडांचं जशास तसे उत्तर

'मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा आणि फडणवीस यांनाच...;

 • Share this:
  बुलडाणा, 19 एप्रिल : 'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना तळीराम पाळायची सवय आहे आणि त्यांच्या जवळचे नेतेच लेडीज बारमध्ये जातात आणि आम्हाला सल्ला द्यायचे काम करू नका, त्यापेक्षा केंद्र सरकारला द्या', असा सणसणीत टोला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikawad) यांनी लगावला आहे. बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तळीराम संबोधले होते, आणि 'त्यांची रात्रीची उतरली नसेल म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असा टोला लगावला होता.  त्यावर पलटवार करत आमदार गायकवाड यांनी फडणवीस यांनाच खडेबोल सुनावले आहे. राज्यातील निर्बंध अधिक कडक; किराणा दुकानाच्या वेळांमध्ये झाला मोठा बदल 'मला सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी केंद्राला सल्ला द्यावा आणि फडणवीस यांनाच तळीराम पाळायची सवय असून लेडीज बारमध्ये त्यांच्या जवळचे माजी मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जातात', असा टोला लगावला आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भाजपचा चांगलाच समाचार घेतला. शिवाय नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटवर गायकवाड यांनी टीका केली. मी काय टीका केली आणि नारायण राणे यांचा बेंडुक नितेश राणे याने टीका केली. या कोंबड्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची मग आम्ही काय  त्यांची पूजा करायची. तुम्ही मुख्यमंत्र्यांना काम करू देत नाही, खालच्या पातळीवर टीका करता, मी याबद्दल बोलण्यासाठी नितेश राणेंना फोनही केला होता, मात्र बोलणे झाले नाही. त्यांना ट्वीट करूनच उत्तर देणार आहे, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय? शहरातील दिलासादायक आकडेवारी समोर तर दुसरीकडे, बुलडाणा जिल्ह्यात कालपासून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून आज माजी मंत्री संजय कुटे हे आमदार संजय गायकवाड यांच्या 50 मीटरच्या आता येऊन दाखवं, या चॅलेंज ला न घाबरता बुलडाणा शहरात दाखल होऊन शहरात परिक्रमा घातली. तर गायकवाड यांच्या कृत्याचा निषेध करत घोषणाबाजी केली. आणि नंतर जिल्हाधिकारी सह पोलीस अधीक्षक यांच्याकडे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केलीय आणि गायकवाड यांचा विषय आता संपल्याचे जाहीर केलंय.
  Published by:sachin Salve
  First published: