Home /News /maharashtra /

देवेंद्र फडणवीस वापरणार राज ठाकरेंची स्टाइल, म्हणणार 'लाव रे तो व्हिडीओ'!

देवेंद्र फडणवीस वापरणार राज ठाकरेंची स्टाइल, म्हणणार 'लाव रे तो व्हिडीओ'!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज उस्मानाबादेत अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे

उस्मानाबाद, 20 ऑक्टोबर : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आहे. भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. आता महाविकास आघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडीओ' स्टाइलने टीका करणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज उस्मानाबादेत अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे. फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. याच मुद्यावरून सरकारला घेरण्याची फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. हे' कार्ड असेल तरच मिळणार Corona vaccine, पंतप्रधान मोदी यांनी दिले संकेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लाव रे तो व्हिडीओ म्हणत एकच गोंधळ उडवून दिला होता. आता देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारविरोधात 'लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग करणार आहे. सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कोरडवाहु शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये आणि बागायतीसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. या दोन्ही नेत्यांचे जुने व्हिडिओ काढून राज्य सरकारला शेतकऱ्यांना त्यांची मदत करण्याची नेमकी काय भूमिका होती याची आठवण फडणवीस करुन देणार आहेत. मोफत इंटरनेटसाठी जोडप्याने घेतला 'हा' अजब निर्णय आज देवेंद्र फडणवीस हे उस्मानाबादेतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहे. त्याआधी ते पत्रकार परिषद घेणार आहे. सोमवारी रात्री उशिरा सुद्धा फडणवीस यांनी पाहणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतनिधीवरून राजकीय चिखलफेक आता आणखी रंगणार हे स्पष्ट आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Raj Thackery, देवेंद्र फडणवीस

पुढील बातम्या