Home /News /maharashtra /

स्वातंत्र्यवीरांवर गलिच्छ आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्रावर भडकले फडणवीस

स्वातंत्र्यवीरांवर गलिच्छ आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्रावर भडकले फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुल्डोजरने हटवण्याचा निषेध करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एका मासिकाकडे लक्ष वळवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अत्यंत हीन शब्दांत अवमान करणारे लेखन काँग्रेसचं मुखपत्र असणाऱ्या 'शिदोरी' या मासिकात छापून आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. काय आहे नेमकं या मासिकात?

पुढे वाचा ...
  मुंबई, 13 फेब्रुवारी : छिंदावाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याप्रकारे बुल्डोजरने हटवला, त्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला. राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याचं सत्र काँग्रेसनं थांबवलं नाही, तर रस्त्यावर उतरू अशा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अत्यंत हीन शब्दांत अवमान करणारं लेखन काँग्रेसचं मुखपत्र असणाऱ्या 'शिदोरी' या मासिकात छापून आल्याचा दावा फडणवीस यांनी केला. शिवसेना कुठलाही अभ्यास न करता सावरकरांचं समर्थन करते, असा दावाही या मासिकातल्या एका लेखात केला असल्याचं फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलं. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. काय आहे या 'शिदोरी'त शिदोरी या मराठी नियतकालिकेचे संपादक रत्नाकर महाजन आहेत. ते काँग्रसेचे प्रवक्ते म्हणूनही काम करतात. या मासिकातल्या दोन लेखांवर फडणवीस यांनी आक्षेप घेतला. 'अंधारातील सावरकर' या लेखाचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, या लेखात अत्यंत गलिच्छ शब्दांत आरोप करून स्वातंत्र्यवीरांचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं राजकीय वादळ सावरकरांचा उल्लेख माफीवीर म्हणून काँग्रेस करत आली आहे. आता त्याच्या पुढे जात त्यांनी घाणेरडे आरोप केले आहेत. सावरकर बलात्कारी असल्याचा दावा, या लेखात करण्यात आला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली त्यांना लंडनमध्ये तुरुंगात ठेवलं असल्याचं लेख सांगतो. हे लिखाण शिवसेनेला मान्य आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिणार आहोत, असंही फडणवीस म्हणाले. मासिकावर बंदीची मागणी शिदोरी मासिकातून हे आक्षेपार्ह लिखाण परत घेतलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने या नियतकालिकावर बंदी घालावी अशी लेखी मागणी  आपण करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  हेही वाचा - कॉंग्रेस सरकारकडून शाळांमधील सावरकरांचे फोटो काढण्याचा आदेश

   "काँग्रेसने या प्रकरणी माफी मागावी. अशा प्रकारे काँग्रेस लिखाण करणार असेल तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. आता राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही. आताच्या सरकारने बंदी घातली नाही तर भाजपच नव्हे तर सावरकरांना मानणारे लोक या संदर्भात मैदानात उतरतील", असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
  'सत्तेसाठी किती लाचार होणार आहात?' शिवसेनेविषयीसुद्धा या मासिकातल्या लेखात उल्लेख आहे. शिवसेना अभ्यास केल्याशिवाय सावरकरांचं समर्थन करते असं म्हटलं आहे, असं फडणवीस म्हणाले. 'शिवसेनेला हे मान्य नसेल तर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार ते स्पष्ट करावं. सत्तेसाठी आणखी किती लाचार होणार आहात?' असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस भूमिकेवर ठाम, माफी नाही फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. याविषयी शिदोरी मासिकाचे संपादक रत्नाकर महाजन यांनी पक्षाने लेख मागे घेण्याविषयी काही सांगितलेलं नाही, अशी माहिती दिली. हे वाचा - काँग्रेस आमदाराच्या मुलाने ठोकली 4 कोटीची कार, गार्डकडून कबूल करून घेतला गुन्हा 'या मासिकातले लेख ऐतिहासिक सत्यावर आधारित' असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. दोनच लेखांविषयी का बोलता, असंही महाजन यांनी विचारलं. 'मध्य प्रदेशातली घाण महाराष्ट्रात आली' काँग्रेसचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशात मराठी राष्ट्रपुरुषांचा वारंवार अवमान होत आहे, असं फडणवीस म्हणाले. शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने पुनर्स्थापित करावा, अशीही फडणवीस यांनी मागणी केली. मध्य प्रदेशातली घाण तिथेच ठेवा, असं म्हणणाऱ्यांनी आता उत्तर द्यावं. ती घाण महाराष्ट्रात आली आहे, असं फडणवीस म्हणाले. नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला हादरा, भाजपचे 5 नगरसेवक राजीनामा देणार
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Congress, Devendra Fadnavis, V.D. Savarkar, Veer Savarkar

  पुढील बातम्या