मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अजित पवारांच्या प्रश्नांना फडणवीसांचं उत्तर, महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाआधीच राजकारण तापलं

अजित पवारांच्या प्रश्नांना फडणवीसांचं उत्तर, महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाआधीच राजकारण तापलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून विरोधी पक्षावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून विरोधी पक्षावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून विरोधी पक्षावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 16 ऑगस्ट : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे उद्यापासून सुरु होणार आहे. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून विरोधी पक्षावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. विशेष म्हणजे फडणवीस यांनी यावेळी महाविकास आघाडीचा 'गजनी' असा उल्लेख केला. "मला आश्चर्य वाटतं की त्यांनी बेईमानीने आलेलं हे सरकार आहे, असं वक्तव्य केलं जातं. पण मविआचं सरकार बेईमानीचं सरकार होतं. जनमताचा अपमान करुन ते सरकार आलं होतं. त्या सरकारमध्ये ३२ दिवस विस्तार झाला नव्हता. ३५ दिवस त्यांचाही विस्तार झालेला नव्हता. त्यांनी आमच्या सरकारची चिंता करण्यापेक्षा विरोधकांच्या एकजुटीची चिंता केली पाहिजे. कारण नुकतेच ते विरोधात गेल्यानंतर तीन पक्षांच्या तीन दिशा बघायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेता आम्हाला न विचारता केला यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे", असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. ('अजून सुरुवातही झाली नाहीय आणि तुम्हाला एवढी मस्ती आली?', अजित पवार भडकले) "पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विरोधीपक्षाला चहापानाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. पण विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकलाय आणि सातपानी पत्र आम्हाला दिले आहे. यातले चार पाने हे बहुधा आमचेच आहेत. त्याततल्या अक्षरांमध्ये फार बदल नाहीय. शब्दांमध्ये फेरबदल नाहीय. त्यामुळे हे पत्र देताना विरोधी पक्षाला या गोष्टीची विस्मृती झाली की ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते. पण काही हरकत नाही. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळावर विरोधी पक्षाचा विशेष विश्वास दिसतोय. त्यामुळे त्यांनी जे केलं नाही ते त्यांनी आमच्याकडे अपेक्षित केलं आहे. आम्ही आश्वास्त करतो की आमचं सरकार त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. "राज्यात केवळ ४६ दिवसांमध्ये लोकांना फरक दिसतोय. सर्वसामान्यांचं सरकार आल्यासारखं वाटतंय. इथेही पाय ठेवायला जागा नाही. नाहीतर मंत्रालय रिकामं होतं, सह्याद्री रिकामं होतं, मंत्र्यांची बंगले रिकामे होते. आता कुठेही पाय ठेवायला जागा नाही, असं चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारने नऊ-नऊ महिने मदत केली नाही", अशी टीका फडणवीसांनी केली.
First published:

Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis

पुढील बातम्या