मुंबई, 01 नोव्हेंबर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांचे आरोप खोडून काढले आहेत.
मी काचेच्या घरात राहत नाही. माझ्यासाठी हा काही सिनेमा नाही. हे गंभीर प्रकरण आहे. त्याला मी धसास लावणारच असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Those who have relations with the Underworld should not speak about me. I will present evidence of Nawab Malik's relations with the Underworld. I am waiting for Diwali to pass: Former Maharashtra CM and BJP leader Devendra Fadnavis pic.twitter.com/bCQ0JhwUe5
— ANI (@ANI) November 1, 2021
देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय आरोप करत नाही. फडणवीसांवर आरोप मागे घेण्याची कधीच वेळ आली नाही. आम्ही कधीच आरोप मागे घेतले नाही, असंही ते सांगायला विसरले नाहीत.
हेही वाचा- T20 World Cup, IND vs NZ: टीम इंडियाच्या जखमेवर आफ्रिदीनं चोळलं मीठ
ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत. त्यांनी माझ्याशी बोलू नये. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध कसे आहेत याचे पुरावे मी तुम्हाला देणारच आहे. पण शरद पवारांनाही हे पुरावे देणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
दिवाळी संपण्याची वाट बघा. आता त्यांनी सुरुवात केली. त्याला अंतापर्यंत न्यावे लागेल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजून खूप आवाज झाल्याचा आव मलिक आणतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
रिव्हर मार्चच्या 4 वर्षांच्या मोहिमेदरम्यान शूटींगवेळी हे फोटो काढले आहेत. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला, असल्याचं फडणवीस म्हणालेत. रिव्हर मार्चकडून या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकले त्यामुळे त्याची पूर्ण पार्टी ड्रग्ज माफिया म्हणायची का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा- देशातल्या Corona लसीकरणासंदर्भातली मोठी अपडेट, जनतेसाठी नवी मोहिम सुरु
तसंच दिवाळीनंतर मी बॅाम्ब फोडेल असा इशारा ही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मी काचेच्या घरात राहत नाही. त्यांनी सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis