टेंभुर्णी, २० मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी राज्याची काही ब्राह्मण (brahman ) संस्था आणि संघटनांना बैठकीसाठी बोलावले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. इतक्या वर्षांनी शरद पवार यांनी ब्राह्मण संघटनांना भेटीसाठी बोलावले, याचा आनंद आहे, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.
शनिवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. देवेद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दांत पवारांच्या या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
'आनंद आहे इतके वर्षांनी पवार साहेबांना ब्राह्मणांची आठवण आली. कुणालाही बैठक घेण्याचा आणि बोलवण्याचा अधिकार आहे. कोणत्याही समाजाची बैठक बोलवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे फार नकारात्मकपणे पाहण्याची गरज आहे. आता त्यांना आठवण आली असेल तर जरूर त्यांनी बैठक करावी, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
(खूनी नाल्याजवळ बचाव मोहिमेदरम्यान दरड कोसळली; थरकाप उडवणार व्हिडीओ)
दरम्यान, प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून ही बैठक बोलावण्यात आहे. ते सर्व ब्राह्मण संस्थांबरोबर संपर्क ठेवून असतात, त्यांच्या विषयी आपल्याला आदर आणि सन्मानच आहे. परंतु, पवार साहेबांना सार्वजनिक व्यासपीठावर भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असं आम्हाला वाटतं. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नाही, असं म्हणत पुण्यातील ब्राह्मण महासंघाचे आनंद दवेंनी स्पष्ट केलं.
(खरं की काय? 100 रुपयांच्या टॅब्लेटवर व्यापाऱ्यांना मिळतो1000% हूनही अधिक नफा)
'काही संस्था निश्चितच मीटिंगला जात आहेत, त्यांना शुभेच्छा इतरांनी काय करावे हे आपण कधीच सांगत नाही. आपण आपली भूमिका ठरवण्या आधी मी स्वतः सर्व विश्वस्त, कार्याध्यक्ष यांच्या बरोबर बोलून त्यांची पण मते जाणून घेतली, आज प्रवासात सुद्धा आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली त्यांना सुद्धा हेच पटत आहे. आमचा पवार साहेबांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही, त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच फारसे ऐकीवात नाही पण राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित. त्यांनी मिटकरी, भुजबळ यांची वक्तव्य यांच्या बाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे, अशी टीकाही दवेंनी के
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.