पंतप्रधान मोदींच कौतुक करत मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले...

पंतप्रधान मोदींच कौतुक करत मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले...

'महाराष्ट्र हे भ्रष्टाचार आणी दलालांचा अड्डा बनला होता, गेल्या 5 वर्षात या दलालांना चपराक दिली.'

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक 19 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिनाभरापासून काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्राचं अख्ख मंत्रिमंडळ, सर्व आमदार, खासदार या सभेला उपस्थित होते. राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन नुकतेच भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगडी घालून सत्कार केला. यावेळी सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच कौतुक केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वाचे लोकप्रिय नेते असं कौतुक करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

कर भरू शकत नाहीत नेते, कोट्यवधींची संपत्ती असूनही सरकारी तिजोरीवर भार!

मुख्यंत्री म्हणाले, तुमची मानसीकता राजेशाही. आम्ही जनतेचे सेवक आहोत. असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या खतावणी ठेवतो या वक्तव्याचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी हे अखिल विश्वात लोकप्रिय नेते आहेत. 370 कलम रद्द करण्याचं अभूतपूर्व काम नरेंद्र मोदी यांनी केलं. राज्याचा राजकारणात  माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्र हे भ्रष्टाचार आणि दलालांचा अड्डा बनला होता. गेल्या 5 वर्षात या दलालांना चपराक दिली, कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप गेल्या 5 वर्षात सरकारवर नाही.

महाजनादेश यात्रा हा ग्रामराज्य ते रामराज्य असा प्रवास आहे. साडेतीन कोटींचे धनादेश या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जनतेनं दिले. यात्रेचं गावागावात महिलांनी अभूतपूर्व स्वागत केलं. उज्वला योजनेचा लाभ महिलांना मिळाला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार, देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रीलियन डॉलर करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1ट्रीलियन डॉलर करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचा पत्ता कट? मोदींसमोर चंद्रकांत पाटील म्हणतात, फडणवीसच पुन्हा होणार CM

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा दूरदृष्टी असणारा नेता

- गेल्या 5 वर्षात राज्याची मोठी प्रगती केली

- सलग 5 वर्ष पूर्ण करणारा दुसरा मुख्यमंत्री

- मराठा समाजाला आरक्षण दिलं, धनगर समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली,ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय केलं,सारथी योजना सुरू केली,महाज्योति संस्था सुरू केली,जलयुक्त शिवार,राज्यातील 70 हजार आशा वर्कर आंदोलकांना मानधन देण्याचा निर्णय घेतला,सर्व समजाला सुरक्षितता दिली ... अश्या अनेक गोष्टी केल्या

- महाजनादेशला जनतेनं आशीर्वाद दिलाय.

First published: September 19, 2019, 3:04 PM IST

ताज्या बातम्या