मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai Blast, अंडरवर्ल्ड आणि हसीना पारकर; देवेंद्र फडणवीसांनी फोडला 'नवा'बॉम्ब

Mumbai Blast, अंडरवर्ल्ड आणि हसीना पारकर; देवेंद्र फडणवीसांनी फोडला 'नवा'बॉम्ब

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 09 नोव्हेंबर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा खळबळजनक खुलासा केला आहे. मी सांगणार तो काही पिचर नाही. हा राष्ट्र हिताचा मुद्दा आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेस सुरुवात केली.

सरदार शहाबअली खान. हे 1993 च्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप होती आणि ती कायम केली. याच्याकडे मुंबई महापालिका आणि बीएसीची रेकी केली आणि टायगर मेमनच्या घरी तो होता. त्याने बॅाम्ब बनवत होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. सॅालिडस असे नाव आहे. फराझ मलिक नवाब मलिक यांच्या मुलाने खरेदी केली.त्यावेळी जमिनीचा दर काय होता ही जमीन 30 लाखात विकत घेतली होती, असा खुलासा फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा- राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता उद्धव ठाकरेही करणार नव्या घरात गृहप्रवेश

सलीम पटेल हे दुसरे कॅरेक्टर आहे. आरआर पाटील बरोबर ज्या माणसाचा फोटो होता तो हा. हा हसिना पारकरचा ड्राईव्हर होता. दाऊद भारतातून गेल्यावर सर्व संपत्ती सलीम पटेलच्या नावे पावर ॲाफ अटर्नी होत होती. कुर्ल्यात 3 एकर जागा ज्याला गोवावाला कंपाऊड म्हणतात. जी एलबीएस रोडवर आहे. या जमिनीची रजिस्ट्री सॅालिटेअर नावाच्या कंपनीला विकली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडवर अगदी महागडी जागा होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटंबाच्या कंपनीला जमीन विकली. या कंपनीच्या वतीनं जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांनी सही केली आहे. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा- Breaking News: अँटॉप हिल परिसरात कोसळलं घर, रेस्क्यू ऑपरेशन सुरु

स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीचे डायरेक्टर होते. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी सॉलिडस कंपनीला ही जागा केवळ 30 लाख रुपयांना विकली आहे. कुर्ल्यातील जवळपास तीन एकर जमीन 30 लाखांना विकली. तर याचं 20 लाखांचं पेमेंट करण्यात आलं आहे. सद्यस्थितीतही त्या ठिकाणी एक मोठं शेड सॉलिडस कंपनीनं भाड्यानं दिलेलं असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच मला मिळालेल्या माहितीनुसार आजही एक कोटी महिना या जागेचं भाडं सॉलिडसला मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल फडणवीसांनी दिला होता इशारा

या महिन्याच्या सुरुवातीला राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांचे आरोप खोडून काढले होते. मी काचेच्या घरात राहत नाही. माझ्यासाठी हा काही सिनेमा नाही. हे गंभीर प्रकरण आहे. त्याला मी धसास लावणारच असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. तसंच दिवाळीनंतर मी बॅाम्ब फोडेल असा इशारा ही देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मी काचेच्या घरात राहत नाही. त्यांनी सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब फोडला आहे.

पत्रकार परिषदेपूर्वी नीरज गुंडे यांच सूचक ट्विट

नीरज गुंडे यांनी ट्विट मध्ये असं म्हटलं होतं की, या पत्रकार परिषदेमध्ये नक्कीच काही तरी त्यांच्या आधीच्या पत्रकार परिषदेत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काहीतरी मनोरंजक नक्कीच समोर येईल! हे त्याच्या डेटा बँकेत कोणत्या प्रकारची माहिती आहे हे दर्शवेल!

First published:

Tags: Devendra Fadnavis, Nawab malik