मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महत्त्वाची खाती भाजपकडे, मग शिवसेनेच्या खात्यांना किती निधी? फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

महत्त्वाची खाती भाजपकडे, मग शिवसेनेच्या खात्यांना किती निधी? फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

उद्यापासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session Maharashtra) सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 16 ऑगस्ट : उद्यापासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session Maharashtra) सुरूवात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरचं हे पहिलंच मोठं अधिवेशन आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांनीही विरोधकांवर जोरदार हल्ला केला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व महत्त्वाची खाती भाजपला (BJP) मिळाली असल्याची टीका शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटासोबत असलेले नेते, तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीने केली. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. भाजप मंत्र्यांच्या कोट्याला 3 लाख 17 हजार कोटी तर शिंदे गटाच्या कोट्याला 1 लाख 37 हजार कोटी निधी आहे. भाजपच्या खात्यांना 60 टक्के आणि शिवसेनेच्या खात्यांना 40 टक्के निधी असेल. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 12.88 टक्के निधी होता, अशी आकडेवारी फडणवीस यांनी सांगितली. महाविकासआघाडी सरकार असताना गेल्या अडीच वर्षांमध्ये 700 रुपये बोनस धान शेतकऱ्याला देणार, असं सांगितलं पण त्यांना एक नवा पैसा मिळाला नाही. लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही, हे लबाडाच निघाले, असा टोलाही फडणवीस यांनी हाणला. 'नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार घातला. विरोधी पक्षनेत्यांनी 7 पानी पत्र दिलं आहे, त्यातली 4 पानं आमचीच आहेत. जे जे त्यांनी केलं नाही त्या अपेक्षा त्यांनी आमच्याकडे व्यक्त केल्या आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या सगळ्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू. गजनीची लागण विरोधी पक्षाला झाली आहे,' असं प्रत्युत्तरही फडणवीस यांनी दिलं. मागच्या अडीच वर्षांमध्ये मंत्रालय रिकामं होतं, पण आता कुठेही पाय ठेवायला जागा कमी पडत आहे. घोषित केलेली मदत आणि मिळालेली मदत यात मागच्या सरकारच्या काळात 9-9 महिन्यांचे अंतर पाहायला मिळत होतं. आता हे पाहायला मिळणार नाही. अतिवृष्टी भागातले 95 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे लवकरच जमा होतील, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे.
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena

पुढील बातम्या