‘मी पुन्हा येईन’च्या भाषणानं सोशल मीडियावर धुमाकूळ, चिमुकल्याच्या डायलॉगवर लाईक्सचा तुफान पाऊस

‘मी पुन्हा येईन’च्या भाषणानं सोशल मीडियावर धुमाकूळ, चिमुकल्याच्या डायलॉगवर लाईक्सचा तुफान पाऊस

फडणवीसांचा ‘पुन्हा येईन’ हा डायलॉग काही सोशल मीडियातून जायचं नाव घेत नाहीय. फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या डॉयलॉगनं शोलेच्या डायलॉगलाही मागे टाकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतका तो प्रत्येकाच्या ओठांवर आहे. सोशल मीडियात तर या डॉयलॉगचं पुन्हा तुफान आलंय.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी: मंडळी, ‘मी पुन्हा येईन’ असं छातीठोकपणे सांगणारे फडणवीस पुन्हा आले खरे, पण 79 तासात त्यांना पुन्हा जावंही लागलं. फडणवीस येवून गेलेही, पण फडणवीसांचा ‘पुन्हा येईन’ हा डायलॉग काही सोशल मीडियातून जायचं नाव घेत नाहीय. फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या डॉयलॉगनं शोलेच्या डायलॉगलाही मागे टाकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतका तो प्रत्येकाच्या ओठांवर आहे. सोशल मीडियात तर या डॉयलॉगचं तुफान आलं. त्याचे अनेक मीम्स व्हायरल झाले. जोक्स आले. इतकंच काय काही हौशींनी तर त्याच्यावर गाणीही रचली. हे कमी म्हणून की काय सध्या एका चिमकल्याच्या निरागस भाषणानं सोशल मीडियावर अक्षरश धुमाकूळ घातलाय.

रायगड जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्तानं भाषण करणाऱ्या चिमुकल्याचा हा व्हिडिओ आहे. शाळेचं आणि त्याचं नाव कळू शकलेलं नाही. पण त्याचे देशभक्तीबदद्लचे बोबडे बोल ऐकून कुणालाही त्याचं कौतुक वाटल्याशिवाय राहात नाही. पण खरी गंमत पुढेच आहे. त्या इवल्याशा भाषणाची सांगता करताना त्यानं पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन असं म्हणताना त्यानं साधलेलं टायमिंग भन्नाट आहे. ते पाहाणारा प्रत्येकजण खळखळून हसल्याशिवाय राहात नाही. चिमुकल्याच्या शब्दातला निरागसपणा अनेकांना भावतोय. जिल्हा परिषद शाळेतल्या मुलाचा धाडसीपणा भाव खाऊन जातोय. म्हणून अवघ्या काही तासात लाखो जणांनी निरागस बोबड्या बोलांवर लाईक्सचा अक्षरश पाऊस पडलाय.

वाचा : 'महाराष्ट्रात 1300 शाळा बंद केल्यात, जरा आमच्या शाळा पाहा', केजरीवालांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2020 08:30 PM IST

ताज्या बातम्या