मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भंडारा 10 बाळांच्या मृत्यू प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

भंडारा 10 बाळांच्या मृत्यू प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

'ही महाराष्ट्रासाठी काळी घटना आहे. भंडारा जिल्हा रूग्णालय प्रशासन व फायर विभागाचे ऑडिट न झाल्यामुळेच ही घटना घडली आहेट

भंडारा, 09 जानेवारी : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (Bhandara District General Hospital) 10 नवजात बाळांचा मृत्यू प्रकरणामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या प्रकरणावरून राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devndra fadanvis) यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी भंडाऱ्यात पोहोचले होते. जिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली.

'भंडारा जिल्ह्यात घडलेली घटनाही अत्यंत दुर्दैवी आहे. एखाद्या शासकीय रुग्णालयामध्ये बालकांचा मृत्यू होणे ही लाजीरवाणी घटना आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जे कुणी या प्रकरणात दोषी आहे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

'ही महाराष्ट्रासाठी काळी घटना आहे. भंडारा जिल्हा रूग्णालय प्रशासन व फायर विभागाचे ऑडिट न झाल्यामुळेच ही घटना घडली आहे. त्यामुळे दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी आणि मृत्यु पावलेल्या बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाखा रुपयांची मदत तात्काळ द्यावी', अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आम्हाला यात कोणतेही राजकारण करायचे नाही. पण, सरकारकडून जे दावे केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. हे यातून स्पष्ट दिसत आहे, असा आरोपही फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकार केला.

सर्व रुग्णालयांचे होणार ऑडिट!

दरम्यान,  भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

'अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे तसंच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान,  भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

First published: