मुंबई, 20 जून : 'आमचं सगळं ठरलं आहे. यापुढे सगळं समसमान पाहिजे,' अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच जाहीर केली. पण उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला भाजपने धक्का दिला आहे. कारण भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे.
'देवेंद्र फडणवीस यांना सर्वांचा पाठिंबा आहे आणि भविष्यातही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील,' असा दावा भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला आहे. भाजपच्या या दाव्यामुळे शिवसेनेच्या 'समसमान'च्या भूमिकेला चांगलाच धक्का बसला आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वाटाघाटीबद्दल भाष्य केलं. 'आमचं सगळं ठरलंय. योग्य वेळी जाहीर करू. आता सगळं समसमान पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांकडे पाहून उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आता यापुढे एका युतीची पुढची गोष्ट असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सर्वात मोठा खुलासा केला. आम्ही सर्व ठरवलं आहे. 'कुणाला काय चर्चा करायची ते करू द्या. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय सांगू,' असं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच खुलासा केला. ते म्हणाले, 'मी इथे आलोय तमाम शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी. आपल्या घरातही जेंव्हा दोन भाऊ एकत्र रहातात तेंव्हा कधी कधी ताण तणाव होतात. आत जो काही ताण तणाव होता तो आता दूर झालांय. जेव्हा वाघ आणि सिंह एकत्र येतो तेंव्हा राजा कोण असणार हे सांगायला नको. मग किती ही आघाड्या असो काहीही फरक पडणार नाही.'
VIDEO: प्यार के दुश्मन ! मुला-मुलीच्या आईमध्ये प्रेमप्रकरणावरून तुफान राडा