मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अधिवेशन गाजवलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी एक नवी जबाबदारी

अधिवेशन गाजवलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी एक नवी जबाबदारी

या अधिवेशनात फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला (Thackeray Government) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते काही अंशी यशस्वीही झाले.

या अधिवेशनात फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला (Thackeray Government) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते काही अंशी यशस्वीही झाले.

या अधिवेशनात फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला (Thackeray Government) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते काही अंशी यशस्वीही झाले.

मुंबई, 13 मार्च : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेच्या केंद्रस्थानी होते. कारण या अधिवेशनात फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला (Thackeray Government) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ते काही अंशी यशस्वीही झाले. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

हेही वाचा - वाजपेयी सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या माजी भाजप नेत्याचा TMC मध्ये प्रवेश

या आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेद्वारे अनेकदा भाजप कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात येते. काही दिवसांपूर्वीच आयोजित करण्यात आलेल्या अशा अभ्यासवर्गाला राज्यातील भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra, Mumbai, RSS, Uddhav thackeray