मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'ते पुन्हा आले', एक-दोन नाही तर 7 खाती घेऊन, शिंदे सरकारमध्ये फडणवीस पॉवरफूल!

'ते पुन्हा आले', एक-दोन नाही तर 7 खाती घेऊन, शिंदे सरकारमध्ये फडणवीस पॉवरफूल!

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर (Cabinet Expansion) आता राज्य सरकारकडून खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) शिवसेना आणि भाजप यांच्या या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सगळ्यात पॉवरफूल मंत्री आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 ऑगस्ट : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर (Cabinet Expansion) आता राज्य सरकारकडून खातेवाटपही जाहीर करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) शिवसेना आणि भाजप यांच्या या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सगळ्यात पॉवरफूल मंत्री आहेत, कारण त्यांना जम्बो खाती देण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरकारमधली तब्बल 7 खाती देण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह तसंच वित्त व नियोजन ही दोन अत्यंत महत्त्वाची खाती आहेत. याशिवाय त्यांना विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार मंत्री करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या 7 खाती असली तरी पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडची काही खाती कमी व्हायची शक्यता आहे, पण गृह आणि वित्त व नियोजन ही दोन महत्त्वाची खाती फडणवीस यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. फडणवीसांचं गृहखात्यावर खास प्रेम देवेंद्र फडणवीस यांनी 2014 साली मुख्यमंत्री झाल्यावरही स्वत:कडे गृहखातं ठेवलं होतं. 2019 नंतर फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं. सचिन वाझे प्रकरण असो किंवा विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या व्हिडिओ क्लिप. फडणवीस यांनी सरकारला गोत्यात आणलं, त्यावेळीही गृहखात्यातल्या फडणवीसांच्या अदृष्य हाताचीही चर्चा झाली. एवढच नाही तर फडणवीस एफबीआय म्हणजेच फडणवीस ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन चालवत असल्याचंही बोललं गेलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपने अनेकांना धक्का दिला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनीच केली. याच पत्रकार परिषदेमध्ये आपण सरकारमध्ये सामील होणार नाही, तर बाहेरून पाठिंबा देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशावरून फडणवीस यांना मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. या सगळ्या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचीही चर्चा झाली. भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचंही मनावर दगड ठेवल्याचं वक्तव्य वादात सापडलं होतं. आता मात्र शिंदेंच्या मंत्रिमंडळात फडणवीस यांना पॉवरफूल खाती मिळाली आहेत. मुख्यमंत्र्यांकडे कोणती खाती? मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग इतक्या खात्यांची जबाबदारी आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या