राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया...

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया...

'राज्यपाल यांच्याकडे जी निवेदन येत असतात, ती निवेदन घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात'

  • Share this:

जामनेर, 13 ऑक्टोबर : मंदिरं उघडण्यात यावी या मागणीवरून एकीकडे भाजप रस्त्यावर आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. 'मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे, ते अतिशय दुर्दैवी असं उत्तर आहे', अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटनासाठी आज जामनेर येथे आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

'राज्यपाल यांच्याकडे जी निवेदन येत असतात, ती निवेदन घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे पत्र पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे.  तीन पक्षाचे सरकार आहे. शिवसेना ही स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई लढतो, असल्याचं सांगतो पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री लिलावतीमध्ये दाखल, उद्धव ठाकरेंनी बैठक केली रद्द

तसंच, 'देशभरात मंदिर उघडण्यात आली आहे. मंदिरांमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करून मंदिर उघडता येता. मंदिरांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला अशी कोणतीही घटना घडली नाही. मंदिरं ही केवळ बळ देणारी स्थळं नाही. तर फुल विक्रेता, नारळ विक्रेता, चहा टपरी चालवणारे बेरोजगार झाले आहे. त्यांना सरकारने कोणतीही मदत दिली नाही. जर मदिरालय सुरू होत असेल तर मंदिरं का सुरू होत नाही, अशी आमची मागणी आहे म्हणून आज राज्यात आंदोलन करण्यात आले आहे, असंही फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या पत्र व्यवहारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  'मंदिरं खुली करण्यासाठी नियमावली तयार करा आणि परवानगी द्या. त्यासाठीच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की राज्यपालांनी मला हिंदुत्व शिकवू नये. सावरकरांना काँग्रेसने समलिंगी म्हटलं होतं. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी थोबाडीत मारली असती. कोणता दाखला देण्याची भाषा करताय? असा सवाल पाटील यांनी उपस्थितीत केला.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे उद्धव आपल्या पत्रात?

'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

5 लाखांना ऑनलाइन विकत घेतली मांजर, बॉक्स उघडला तर त्यात होता वाघाचा बछडा

'Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणता गेल्या 3 महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील 3 पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो' असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

Published by: sachin Salve
First published: October 13, 2020, 4:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading