Home /News /maharashtra /

'एकनाथ शिंदे गटातल्या 40 आमदारांचे...' ठाकरे सरकार कोसळल्यावर फडणवीस म्हणाले...

'एकनाथ शिंदे गटातल्या 40 आमदारांचे...' ठाकरे सरकार कोसळल्यावर फडणवीस म्हणाले...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपावला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 29 जून : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या सत्तानाट्यावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे आता भाजपच्या (BJP) सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर मुंबईच्या हॉटेलमध्ये असलेल्या भाजप आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील 40 आमदारांचे विशेष आभार. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंमत केली, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. येत्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. पुढच्या सूचना येईपर्यंत सगळ्या आमदारांना मुंबईतच थांबावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यपाल सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी लागणारं बहुमत आहे का नाही, याबाबत विचारणा करतील. भाजपने जर बहुमताच्या आकडेवारीचं पत्र दिलं तर राज्यपाल त्यांना शपथविधीसाठी बोलावू शकतात. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस शपथविधी घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Uddhav thackeray

    पुढील बातम्या