देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी समर्पित केलं बॉलिवूडमधील हे प्रसिद्ध गाणं; पाहा काय म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी समर्पित केलं बॉलिवूडमधील हे प्रसिद्ध गाणं; पाहा काय म्हणाले...

देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपले जुने मित्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी बॉलिवूडमधलं एक गाणं समर्पित (Dedicated song) केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यात आधी असलेल्या मैत्रीची चर्चा राजकीय वर्तुळाला नवी नाही. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. महाराष्ट्रात युतीची सत्ता असताना या दोघांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. पण अलीकडेच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजपचा काडीमोड झाला. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. यात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीतही दरी निर्माण झाली.

एकंदरीत अशी परिस्थिती असताना दवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना एक गाणं समर्पित केलं आहे. जुन्या दोस्ताला समर्पित केलेलं हे गाणं बरंच काही सांगून गेलं आहे. त्यांनी नुकतचं लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जुने मित्र उद्धव ठाकरे यांना बॉलीवूडचं एखादं गाणं समर्पित करायचं असेल तर, कोणतं गाणं समर्पित कराल?

या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या जुन्या दोस्तासाठी 'दोस्त दोस्त न रहा...' हे गाणं समर्पित केलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही तिथे उपस्थित होत्या. त्यांनाही हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी 'अजिब दास्तां है ये, कहा शुरू कहा खतम...' हे गाणं उद्धव ठाकरे यांना समर्पित केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तसंच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणी बंजारा समुदायात प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Published by: News18 Desk
First published: February 16, 2021, 9:27 PM IST

ताज्या बातम्या