मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फडणवीसांची नवी खेळी, मास्टरस्ट्रोकने पवारांनाच केलं चित

फडणवीसांची नवी खेळी, मास्टरस्ट्रोकने पवारांनाच केलं चित

आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर देखील निशाणा साधला. यावर आता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई :  सध्या राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वातावरण चांगलच तापलं आहे. त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. आज उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या टीकेचा समचार घेतला. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या पत्रकार परिषदेतून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटले फडणवीस?  

छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर पवार यांच्या लक्षात आलं, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आज पवार आधी बोलले पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरेंना प्रतिक्रिया द्यावी लागते असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. उद्धव ठाकरे काय बोलले यावर मी बोलणार नाही, कारण मी ऐकलं नाही. परंतु शरद पवार बोलले की उद्धव ठाकरेंना बोलावंच लागतं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : राज्यपालांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र बंदचा इशारा

सीमावादावर प्रतिक्रिया 

दरम्यान  यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र, कर्नाटक वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रश्न जेव्हापासून राज्यांची निर्मिती झाली तेव्हापासून आहे. आपल्या देशात संविधान आहे. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही. मी कोणतेही चिथावणी खोर वक्तव्य केलेलं नाही. मी केवळ आपली भूमिका मांडली असल्याचं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Sharad Pawar, Shiv sena, Uddhav Thackeray