मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करतात, मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका

मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करतात, मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका

पालघमध्ये श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याबाबत इतर पक्षांसोबत बोलत असताना मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करत होते, अशी टीका शिवसेनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली.

  • Share this:

20 मे : कर्नाटकानंतर आता लक्ष आहे ते पालघर पोटनिवडणुकांवर. पालघमध्ये श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याबाबत इतर पक्षांसोबत बोलत असताना मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करत होते, अशी टीका शिवसेनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली.

मनांत काळबेरे असणाऱ्यांना वनगा विषयी प्रेम नाही, या निवडणूकीत श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाल्यावर मातोश्रीवरील दरवाजे बंद होईल पण भाजपा दरवाजे खुले असतील, अस ही फडवणीस यांनी आवर्जून सांगितले.

पालघर येथे कृष्णा घोडा यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणूक शिवसेना उमेदवार विरोधात भाजापाने उमेदवार दिला नव्हता हे आवर्जून सांगत सीएम यांनी सेनेवर नाराजी व्यक्त केली. भाजपा विजयी म्हणजेच चिंतामन वनगा यांना खरी श्रद्धांजली असेल असे सीएम यांनी म्हटले.

पालघर - लोकसभा पोट निवडणूक प्रचारासाठी पालघर जिल्हयात कासा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा होती, या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

 

First published: May 20, 2018, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading