मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हिंमत होती तर त्यावेळी...' फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

'हिंमत होती तर त्यावेळी...' फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

 तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून

तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून

तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून

    मुंबई, 22 सप्टेंबर : 'शिवसेना आणि आम्ही एकत्र लढलो आणि जास्त जागेसह निवडून आलो. त्यावेळी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्यावेळी राजीनामा का दिला नाही. त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाही? असा परखड सवाल विचारत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गट प्रमुखांच्या मेळाव्यातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केला होता. त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. 'कालचं भाषण म्हणजे, निराशेचं होतं, माझा त्यांना सवाल आहे की, आम्ही एकत्र लढलो आणि जास्त जागेसह निवडून आलो. त्यावेळी आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्यावेळी राजीनामा का दिला नाही. त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाही. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता. तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे द्यायचे असते आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवायचं असतं' असा सणसणीत टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ('...तेव्हा वडिलांना मातोश्रीत ठेवून फाईव्ह स्टारमध्ये कोण होतं?', भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार) 'त्यामुळे मला असं वाटतं, त्यांचं भाषण हे निराशेचं भाषण होतं. ते असंही म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची शेवटची निवडणूक असेल, पण 'मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है', तुम्ही 2019 ला माझा शेवट होणार असं म्हणून प्रयत्न केला. तिघांनाही मिळून मला संपवण्यासाठी अडीच वर्ष प्रयत्न केले, पण कुणीही मला संपवून शकलं नाही, अशी टीकाही फडणवीसांनी केली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट हा 5 नंबरवर गेल्यामुळे ते निराश झाले आहे. भाजपचे 294 सरपंच विजयी झाले आहे. त्यामुळे निराश झाल्यामुळे ते माझ्यावर टीका करत आहे. निराश झाल्यामुळे मीडिया समोर आल्यामुळे काही तरी बोलत असतात. उद्या जरी निवडणूक झाली तर भाजप नंबर 1 चा पक्ष ठरणार आहे.उद्धव ठाकरे हे अत्यंत वाईट मन परिस्थितीत आहे. त्यामुळे बावचाळलेल्या परिस्थितीत अशी विधानं करत आहे. अमित शहा यांच्याबद्दल अशी विधान करणे योग्य नाही. भाजप त्यांना वेळेवर उत्तर देईल, असा इशाराच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. महाविकास आघाडी असताना अडीच वर्ष तेच काम केले होते. आमचे कुटुंब आमची जबाबदारी असं त्यांचं सुरू होतं. मुंबईमध्ये जे बॅनर लागले आहे, त्यावर फक्त ठाकरे कुटुंबाचे फोटो आहे. आम्ही चारचं राहू असे त्यांचे धोरण आहे... चाळीस गेले आता चार ही राहणार नाही.. ते निराश आहेत, घाबरलेले आहेत, भीती दिसू नये म्हणून जोरजोरात बोलत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या