मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राज्यपालांसोबत वाद घालण्याच्या उद्देशाने जायचो, पण कोश्यारी असं घुमवायचे की...', देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा

'राज्यपालांसोबत वाद घालण्याच्या उद्देशाने जायचो, पण कोश्यारी असं घुमवायचे की...', देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'तो' किस्सा

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फाईल फोटो

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फाईल फोटो

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संबंध ताणले गेले होते. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दा असो, कोश्यारी आणि मविआ सरकार यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. हा संघर्ष आणि राज्यपाल कोश्यारी यांचा स्वभाव याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 21 सप्टेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी स्वीकारुन तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्यांनी आतापर्यंत राज्यपाल म्हणून केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा मांडणारं त्यांच्याशी संबंधित पुस्तकाचं आज राजभवनातील दरबार हॉल येथे प्रकाशन झालं. या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा देखील उल्लेख केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संबंध ताणले गेले होते. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा असो किंवा इतर मुद्दा असो, कोश्यारी आणि मविआ सरकार यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता. हा संघर्ष आणि राज्यपाल कोश्यारी यांचा स्वभाव याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं.

"भगत दादावर पुस्तक लिहायचं असेल तर मला वाटतं की, पाच-सहा आवृत्त्या काढाव्या लागतील. पण तुम्ही एकाच पुस्तकात अनेक मुद्द्यांचा चांगल्याप्रकारे उल्लेख केलेला आहे. माझ्या हाती जेव्हा पुस्तक आलं तेव्हा मी विचार करत होतो की एवढ्या लहान पुस्तकात एवढं मोठं कार्य कसं विषद केलं असेल, पण तुम्ही आवश्यक गोष्टींचा पुस्तकात उल्लेख केला आहे आणि ज्या गोष्टी लोकांना समजायला हवीत, पण पुस्तकात जागा नव्हती म्हणून तुम्ही त्या गोष्टींचा उल्लेख टाळला आहे, तुम्ही आणखी काही पुस्तकं लिहिली तर वेगवेगळ्या घटनांचे वेगवेगळे अँगल समोर येतील", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

('मी पान टपरीवर काम करणारा नव्हतो, पण अनेकांना चुना लावला', खडसेंचं गुलाबरावांना प्रत्युत्तर)

"आम्ही जसं अनुभवलं आहे की, तुम्ही मोकळेपणाने बोलतात. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, तुम्ही हसता-हस्ता तोंडावर असं काहीतरी बोलून जातात की समोरच्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात येते. विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे कुणाला रागही येत नाही. तसं दुसरं कोणी बोलू शकत नाही. तुमचे काही सहकारी जे अडीच वर्षांपासून सत्तेत तुमच्यासोबत होते ते आता सत्तेत नाहीत. पण ते आमचे मित्रच आहेत. ते सांगतात की, तुमचे राज्यपाल खूप महान आहेत. मी म्हटलं का? तर ते सांगतात, आम्ही ठरवून राज्यपालांशी वाद घालण्याच्या हेतून राजभवनात जायचो. राज्यपालांना काय-काय बोलून यायचं याबद्दल ठरवून जात. पण राज्यपाल बोलण्यात एवढं गुंतवून टाकायचे की आम्हाला काय म्हणायचं होतं ते आम्ही विसरुन जायचो आणि त्यांच्या गोष्टी ऐकून परत यायचो", असा किस्सा देवेंद्र फडणवीसांनी सांगितला.

"राज्यपालांच्या मनात स्वार्थ नाहीय. स्वत:साठी काही करायचं नाही, जे करायचं आहे ते देश, समाज आणि संविधानासाठी करायचं आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये जी काही राजकीय उलथापालथ झाली या दरम्यान राज्यपालांनी राज्याला नेतृत्व दिलं. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचं हे वैशिष्ट्य आहे. त्यांनी खूप कमी वेळात मराठी शिकली. अशा राज्यपालांसोबत काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजतो", अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Governor bhagat singh