मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देवेंद्र फडणवीस चमकले, भाजपकडे तगडी खाती, मुख्यमंत्र्यांकडेही भरपूर काही, पण...

देवेंद्र फडणवीस चमकले, भाजपकडे तगडी खाती, मुख्यमंत्र्यांकडेही भरपूर काही, पण...

राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात भाजपकडे तगडी खाती देण्यात आली आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात भाजपकडे तगडी खाती देण्यात आली आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात भाजपकडे तगडी खाती देण्यात आली आहेत.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 14 ऑगस्ट : राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना महत्त्वाची जबाबादीरा देण्यात आली आहे. विखे पाटलांना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास या विभागांची जबाबादीर देण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. या खातेवाटपात काही महत्त्वांच्या खात्यांची जबाबादारी अद्यापही कुणावर देण्यात आलेली नाही. राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे. त्यामुळे कदाचित त्या खात्यांची जबाबादारी 18 पैकी इतर मंत्र्यांवर देण्यात आलेली नाही. पण सध्या त्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अतिशय महत्त्वाचे आणि तगडी खाते या दोन्ही बड्या नेत्यांकडे. मुख्यमंत्र्यांकडे कोणती खातं? राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग इतक्या खात्यांची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे कोणती खाती? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तुलनेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमी खाती देण्यात आली आहेत. गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहे. भाजपकडे तगडी खाती? राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पुन्हा एकदा खातेवाटप जाहीर होईल. तेव्हा कदाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे असलेली खाते ही इतर नेत्यांमध्ये वाटले जातील. पण एक गोष्ट निश्चित आहे, मुख्यमंत्र्यांकडे असलेली खाती ही कदाचित त्यांच्या गटाच्या नेत्यांना देण्यात येतील. आणि फडणवीसांकडे असलेली खाते भाजप नेत्यांमध्ये वाटली जातील. तसं असेल तर भाजपकडे सर्वात तगडी खाती राहतील. यामध्ये गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशा महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. (भाजपचं धक्कातंत्र कायम, चंद्रकांत पाटलांचा हिरमोड; हवं असलेलं खातं विखे पाटलांकडे सरकवलं) इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत: 1) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 2) सुधीर मुनगंटीवार - वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय 3) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य 4) डॉ. विजयकुमार गावित - आदिवासी विकास 5) गिरीष महाजन - ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 6) गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 7) दादा भुसे - बंदरे व खनिकर्म 8) संजय राठोड - अन्न व औषध प्रशासन 9) सुरेश खाडे - कामगार 10) संदीपान भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन 11) उदय सामंत - उद्योग 12) तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण 13) रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण 14) अब्दुल सत्तार - कृषी 15) दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा 16) अतुल सावे - सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण 17) शंभूराज देसाई - राज्य उत्पादन शुल्क 18) मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या