मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'टॉयलेट डे'निमित्त भन्नाट शुभेच्छा देत अमृता फडणवीसांनी संजय राऊतांना पुन्हा डिवचलं

'टॉयलेट डे'निमित्त भन्नाट शुभेच्छा देत अमृता फडणवीसांनी संजय राऊतांना पुन्हा डिवचलं

अमृता फडणवीस (amruta fadnavis) या शिवसेनेवर (shivsena) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

अमृता फडणवीस (amruta fadnavis) या शिवसेनेवर (shivsena) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

अमृता फडणवीस (amruta fadnavis) या शिवसेनेवर (shivsena) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

    मुंबई, 19 नोव्हेंबर: आज (19 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, (#InternationalMensDay2020) त्याचबरोबर जागतिक शौचालय (#WorldToiletDay2020)दिनही आहे. या निमित्तानं राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नाही तर अमृता यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर हँडलवरून #InternationalMensDay2020 आणि #WorldToiletDay2020 निमित्त एक ट्वीट केलं आहे. हेही वाचा..भाजप नेत्यानं मनापासून केलं राज ठाकरेंचं अभिनंदन; म्हणाले आम्हीही तुमच्यासोबत अमृता फडणवीस (amruta fadnavis) या शिवसेनेवर (shivsena) टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अमृता फडणवीस यांनी देशातील सर्व राष्ट्रभक्त पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन केलं आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही 'नॉटी' (Naughty)पुरूषांच्या आचार विचारांची घाण 'फ्लश' करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अमृता यांनी या मेसेजमधून थेट संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिच्यावर घणाघाती टीका केली होती. संजय राऊत यांनी कंगनाला 'हरामखोर' असंही संबोधलं होत. यावरुन बराच गदारोळ झाला होता. नंतर संजय राऊत यांनी सारवासारव देखील केली होती. कंगनाला नॉटी गर्ल (Naughty Girl) म्हणायचं होते, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. शिवसेनेला संबोधलं होतं 'शवसेना' दरम्यान, नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून (Bihar assembly result) अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर मोठा हल्लाबोल केला होता. शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ असा करत शवसेनेने आपल्याच साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले, अशी टीका त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एका मुलाखतीचा आधार घेत त्यांनी हा हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत त्यांनी बिहारमध्ये शिवसेनेने किती वाईट कामगिरी केली ते सांगितलं. शिवसेनेने आधीच मोठ मोठ्या गोष्टी केल्या. आम्ही 50 जागा लढवणार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार असं सांगितलं होतं. मात्र त्यांच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट तर जप्त झालंच पण त्यातल्या बहुतांश उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली असा टोलाही फडणवीस यांनी लगावला होता. हेही वाचा...संजय राऊतांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली, प्रवीण दरेकरांनी केला पलटवार अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला टार्गेट केलं. काय चाललं तरी काय- शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बद्दल धन्यवाद असं त्यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे निवडणूक प्रभारी होते. पक्षाला मिळालेल्या यशाचं श्रेय त्यांनाही दिलं जात आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी त्यांचं वजन वाढलेलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Amruta fadanvis, Devendra Fadnavis, Maharashtra, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या