मुंबई, 28 जून : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र जनसंवादाअंतर्गत भाजप मुंबई कोकण संवादाचे आयोजन केलं आहे. यावेळी फडणवीस बोलत होते.
भाजपच्या या व्हर्च्युअल रॅलीत भाजपतील मोठ मोठे नेते सहभागी झाले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणीदेखील सहभागी झाल्या आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटात योग्य निर्णय घेतले. त्यांनी देश सुरक्षित ठेवला, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली आहे. कोरोनात भ्रष्टाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. मोदींजींनी भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी उपाययोजना केल्या. जे म्हणाले ते करुन दाखवलं. मोदींसारख्या कणखर नेतृत्वार देश सुरक्षित असल्याची भावना फडणवीसांनी यावेळी व्यक्त केली.
फडणवीसांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे
-कोकणात मदत साहित्य पुरवलं.
-आत्मनिर्भर भारतअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या
-गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवल्या
-कोरोनाने नवं शहाणपण शिकवलं.
-मजबूत नेत्याचं निर्णायक सरकार
-केंद्र सरकार सर्व मदत करायला तयार होत मात्र महाराष्ट्र सरकार अनेक ठिकाणी कमी पडला
-आज दिल्लीत 21000 टेस्ट दररोज होतात. महाराष्ट्रात 4500 टेस्ट केल्या जात आहेत. कमी टेस्टिंगमध्ये कोरोनाची संख्या दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- महाराष्ट्रात संक्रमणाचं प्रमाण 18 टक्के
-कोरोना काळातही भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे.
-मोठ्या संख्येने विज बिलं पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी येत आहे