What a pity! Now separatist tendencies get a Government advocate. Jayantrao, this vote bank politics is not expected from you. Kashmir has already been freed from discrimination and ... (1/2) https://t.co/VRZURYMnZk
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 7, 2020
काय म्हणाले होते जयंत पाटील? 'फ्री काश्मीर' म्हणजे सर्व प्रकारचे भेदभाव, मोबाईल नेटवर्कवरची बंदी ते केंद्राच्या नियंत्रणापर्यंत सगळ्याच गोष्टीबाबत काश्मीर मोकळा हवा आहे, असा त्याचा अर्थ आहे. तुमच्या सारख्या एका जबाबदार नेता द्वेषयुक्त पद्धतीने अर्थ लावून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय यावर माझा विश्वास बसत नाही. असं सत्ता गेल्यामुळे होतंय की स्वनियंत्रण गेल्याचा परिणाम आहे,' असा बोचरा सवालही जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. काय आहे वादाचं नेमकं कारण? दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर गेटवे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान झळकावण्यात आलेल्या 'फ्री काश्मीर' पोस्टरमुळे वाद निर्माण झाला आहे. या फलकावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारावरून उद्धव ठाकरे यांना सवाल केला होता. मुख्यमंत्री कार्यालयापासून केवळ 2 किमी अंतरावर ही प्रदर्शने होत आहेत. तुम्ही हे कसं खपवून घेत आहात, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला होता.... certain curbs have been there since decades for security concerns. Be it in the Govt or opposition, for us, the only principle is NATION FIRST! (2/2)
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 7, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadanvis, Jayant patil, NCP